"...आता फॅसिझमनं भयानक रुप घेतलं", उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया | fascism has taken a terrible turn Congress first reaction after Uddhav Thackerays resignation rmm 97 | Loksatta

“…आता फॅसिझमनं भयानक रुप घेतलं”, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्याचं स्पष्ट झालं आहे.

“…आता फॅसिझमनं भयानक रुप घेतलं”, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
प्रतिनिधिक छायाचित्र

उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीची गरजच संपुष्टात आली असताना भाजपाच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून आपल्या शेवटच्या जनसंवादामध्ये बंडखोरांवर नाराजी व्यक्त करतानाच पुन्हा एकदा नव्याने शिवसेना भवनात बसून शिवसैनिकांशी संवाद साधणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्वीट करत म्हटलं की, “मविआच्या कल्पनेची अभावितपणे सुरुवात माझ्या मुखातून झाली. त्यामुळे हे सरकार जाण्याचे दुःखही फार आहे. वैचारिक मतभेद असतानाही लोकशाहीवर भाजपाचे संकट पाहून सरकार स्थापन केले होतं. या संकटाने आता फॅसिझमचे भयानक रुप घेतले आहे. विरोधी पक्षातून देश वाचवण्याचा लढा अधिक तीव्र करावा लागेल,” असंही ते म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
मुख्यमंत्री म्हणून शेवटच्या भाषणात उद्धव ठाकरेंनी मानले मुस्लिमांचे आभार; CAA, NRC आंदोलनाचा उल्लेख करुन म्हणाले…

संबंधित बातम्या

“काळ बदललाय, सगळंच तुमच्या…”, राज ठाकरेंच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर!
“आपल्याकडील इतिहास मराठ्यांनी किंवा ब्राह्मणांनी…”, राज ठाकरेंचं मोठं विधान
“पाच कोटी मोजायला गेले होते का?” चंद्रकांत खैरेंच्या आरोपाला गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर
“दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरू नव्हते आणि…”, पुरंदरेंचा उल्लेख करत काँग्रेसचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर
MPSC ने निवडलेल्या १११ उमेदवारांच्या नियुक्तीला उच्च न्यायालयाची स्थगिती; नियुक्तीपत्रासाठी मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“MPSC त उत्तीर्ण नाही झाला तरी गावाकडे…”, गोपीचंद पडळकरांचा विद्यार्थ्यांना अजब सल्ला
पुण्यातून व्यापाऱ्याचे अपहरण करणारा आरोपी राजस्थानमध्ये जेरबंद; प्रेमसंबंधातून अपहरणाचा प्रकार
शाहरुख खानने दिली मक्का मशिदीला भेट, प्रार्थना करतानाचे फोटो व्हायरल; कारण आहे एकदम खास
PAK vs ENG: पाकिस्तानी गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या, रावळपिंडी कसोटीच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडने केले सात विश्वविक्रम
पुणे: कात्रज प्राणी संग्रहालयातील गव्याचा मृत्यू