सोलापूर : द्राक्ष बागेत मजुरीसाठी कर्नाटकातून पंढरपूरकडे निघालेल्या महिला शेतमजुरांच्या क्रूझर गाडीचे टायर फुटल्याने घडलेल्या अपघातात तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला. तर वाहनचालकासह अन्य नऊ महिला शेतमजूर जखमी झाल्या. सांगोल्याजवळ शनिवारी सकाळी आठच्या सुमारास हा अपघात झाला.

या अपघातातील मृत आणि जखमी महिला शेतमजूर कर्नाटकातील अथनी (जि.बेळगाव) येथून पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे द्राक्ष बागेत मजुरीसाठी येत होत्या. जत-सांगोला रस्त्यावर सांगोल्याजवळील लक्ष्मीनगरानजीक त्यांच्या क्रूझर गाडीचे (केए २४ एम ११२१) टायर फुटले आणि गाडी पालथी झाली. अपघात झाला तेव्हा गाडी भरधाव वेगात होती.

crime branch policeman died including women in collision with dumper
ठाणे : डम्परच्या धडकेत क्राईम ब्रांचच्या पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, अपघातात एका महिलेचाही सामावेश
pune rains
“समुद्र नसल्याची पुणेकरांना खंत, म्हणून भाजपाने…”, पहिल्या पावसानंतरची दयनीय स्थिती पाहून जयंत पाटलांचा टोला
pune shirur accident
पार्टीसाठी चाललेल्या तरुणांच्या मोटारीची दुचाकीला धडक; मजुराचा मृत्यू, कल्याणीनगरनंतर शिरुरमध्ये अपघात
pune, Death of a cleaning worker, electric shock accident in Balewadi, Death of cleaning worker due to electric shock, Balewadi area,
पुणे : विद्युत वाहिनीच्या धक्क्याने सफाई कर्मचारी महिलेचा मृत्यू, बालेवाडी भागातील दुर्घटना
Three victims of recklessness Two-wheelers collide head-on
पुणे : बेपर्वाईचे तीन बळी; दुचाकींची समोरासमोर धडक
women died, dumper,
अनियंत्रित डंपरने दिलेल्या धडकेत दोन महिलांचा मृत्यू, वसईत दोन अपघातांत तिघांचा मृत्यू
Death of two bothers due to severe electric shock
कराड : विजेच्या तीव्र धक्क्याने सख्ख्या भावांचा मृत्यू, विहिरीच्या फ्युज बॉक्सजवळ आढळले मृतदेह
The body of a worker missing since the blast at Amudan Chemical Company was found on Thursday
बेपत्ता कामगाराचा मृतदेह सापडला- मृतांचा आकडा १६ वर

हेही वाचा…साताऱ्यासह महाबळेश्वर, पाचगणी ,वाई आणि खंडाळ्यात मुसळधार अवकाळी पाऊस

या अपघातात गीता रवींद्र दोडमनी (वय ३९), कस्तुरी शंकर भिरडे (वय ६४) आणि महादेवी श्रीशैल चैगुला (वय ४०) या तिघा महिला शेतमजुरांचा मृत्यू झाला. तर उज्ज्वला बसप्पा दोडमनी (वय ३५) व मायव्वा बिराप्पा चैगुला (वय २९) या दोघी गंभीर जखमी झाल्या. अन्य जखमींमध्ये कविता अमर दिवटे (वय ३०), सत्यव्वा ऊर्फ महानंदा ईरप्पा चैगुला (वय ३०), राजक्का कमल दोडमनी (वय ४५), अश्विनी काकासाहेब दोडमनी (वय ३०) आदींचा समावेश आहे. वाहनचालक कुमार ऊर्फ श्रीनिवास काडाप्पा जगदाळ (वय २५, रा अथनी, बेळगाव) याच्या विरूध्द सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.