scorecardresearch

बीडमध्ये कार आणि टेम्पोचा भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

अपघातामधील मृत सर्वजण पुण्याचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती

बीडमध्ये कार आणि टेम्पोचा भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

मांजरसुंभा रस्त्यावरील अहमदपूर-अहमदनगर मार्गावर बामदळे वस्ती येथे टेम्पो आणि कारचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये चौरे ( कुटे ) कुटुंबामधील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

बामदळे वस्ती जवळ कारमधील चौरे ( कुटे) परिवार लग्नासाठी केजकडे जात होते. पाटोदा मांजर सुंभा रोडवरील बामदळे वस्ती जवळ कार (स्विफ्ट डिजायर) क्रमांक (एम.एच.१२के.एन ९७६१) व आयशर टेम्पोचा (क्रमांक एम.एच.२६ बी.ई.५९४५) अपघात झाला. आयशर टेम्पो व दुभाजकाच्यामध्ये स्विफ्ट अडकलेली होती. गाडीमधील लहान मुलासह ६ जणांचा जागीच मृत्यू झाला.

पुणे येथून आपल्या नातेवाईकाच्या लग्नासाठी जीवाची वाडी तालुका केज येथे जात असताना, पाटोदा शहराजवळील बामदळे वस्ती येथे आज सकाळी सातच्या दरम्यान अपघात झाला.

यामध्ये जिवाचीवाडी ता.केज जि.बीड येथील रामहरी चिंतामणी कुटे (वय-४०), त्यांच्या पत्नी सुनिता रामहरी कुटे (वय- वर्ष ३५ ), ऋषिकेश रामहरी कुटे, आकाश रामहरी कुटे, प्रियंका रामहरी कुटे, राधिका सुग्रीव केदार यांचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे. अपघात इतका भीषण होता की आयशर टेम्पो व दुभाजकाच्यामध्ये कार घुसल्याने ती काढण्यासाठी क्रेनची मदत घ्यावी लागली. घटनास्थळी पाटोदा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व पोलीस हजर झाले होते, सर्वांनी मृतदेह बाहेर काढण्यास मदत केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fatal accident involving car and tempo in beed six people died on the spot msr

ताज्या बातम्या