वडिलांनीच केली दारुड्या मुलाची हत्या, नागपुरातील घटना

पोलिसांनी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं आहे

वडिलांनीच आपल्या दारुड्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नागपुरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मुलाचा आईसोबत दारुच्या पैशासाठी झालेल्या वादानंतर वडिलांनी हे कृत्य केलं. वडिलांनी सुतारकाम करण्याच्या अवजाराने मुलाची हत्या केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी वडिलांना ताब्यात घेतलं आहे.

दामोदर बाळापुरे असं आरोपी वडिलांचं नाव आहे. मुलगा संजय बाळापुरे याला दारुचं खूप व्यसन होतं. हत्येच्या आरोपाखाली त्याला शिक्षाही झाली होती. दोनच महिन्यापुर्वी त्याची तुरुंगातून सुटका झाली होती. संजय बाळापुरे दारुच्या पैशांसाठी वृद्ध आई-वडिलांना मारहाण करायचा. बुधवारीदेखील त्याचा दारुच्या पैशावरुन आईसोबत वाद झाला.

दामोदर बाळापुरे भांडण सोडवण्यासाठी गेले असता मुलगा संजय बाळापुरे याने त्यांना मारहाण केली. यावेळी आरोपी दामोदर बाळापुरे यांनी सुतार काम करण्याच्या अवजाराने मुलावर वार केले. या हल्ल्यात संजयचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी दामोदर बाळापुरे यांना ताब्यात घेतलं आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Father killed alchohol addicted son in nagpur sgy

ताज्या बातम्या