पित्याचा सावत्र मुलीवर बलात्कार

आरोपी राजकीय नेत्याचा निकटवर्तीय असल्याने गुन्हा दाखल होऊ नये यासाठी दबाव

girl rape
(प्रतिकात्मक छायाचित्र)

कोल्हापूरमधील ताराबाई पार्क येथे पित्याने सावत्र अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. नराधम आरोपी हा बड्या राजकीय नेत्याचा निकटवर्तीय असल्याने गुन्हा दाखल होऊ नये यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्नही झाला होता. पण पीडित मुलीच्या आईने खंबीर भूमिका घेत नराधम पतीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

ताराबाई पार्क येथे राहणाऱ्या तक्रारदार महिलेला पहिल्या पतीपासून सहा वर्षाची मुलगी आहे. महिलेने एका तरुणाशी दुसरे लग्न केले. या लग्नातून तिला मुलगादेखील झाला. मात्र नराधम पतीने त्याच्या सहा वर्षाच्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केला. रविवारीदेखील घरात कोणीही नसताना नराधमाने त्याच्या सावत्र मुलीला वरच्या मजल्यावर नेले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.

माझा पती हा कामधंदा करत नसून त्याने माझ्या कुटुंबीयांकडून २५ लाख रुपये घेतले होते. मात्र हे पैसे त्याने चैनीसाठीच खर्च केले. आरोपी हा माझ्या मुलीला सतत शिवीगाळ करायचा असे महिलेने तक्रारीत म्हटले आहे. आठ महिन्यांपूर्वी पीडित मुलीने आईला सावत्र पित्याने केलेल्या अत्याचाराची माहिती दिली होती. हा प्रकार कोणाला सांगितल्यास ठार मारण्याची धमकीदेखील त्याने मुलीला दिली होती. पीडितेच्या आजीनेही सावत्र पित्याला अत्याचार करताना रंगेहाथ पकडले होते. मात्र त्यानंतर तो घरातून पळून गेला होता. गरोदर असल्याने पीडित मुलीच्या आईला त्यावेळी पोलिसांकडे तक्रार दाखल करता आली नव्हती. मात्र त्यानंतर रविवारी पुन्हा त्याने मुलीवर अत्याचार केल्याने महिलेने पतीविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक तृप्ती देशमुख या अधिक तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Father rapes 6 year old step daughter in kolhapur