बापानेच अल्पवयीन मुलीला दोन वर्षात तीन ठिकाणी विकलं, आरोपींकडून वारंवार बलात्कार; ८ आरोपींना बेड्या

आरोपींमध्ये मुलीच्या सावत्र आईसह तिला खरेदी करणाऱ्या आरोपींचाही समावेश आहे.

Student Gang Raped Boyfriend Thrashed By Robbers Near Mysore
अल्पवयीन बलात्कार पीडितेनं बाळाला जन्म दिल्यानंतर शौचालयात केलं फ्लश (प्रातिनिधीक फोटो)

मागील २ वर्षांत पित्यानेच स्वतःच्या अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या तीन जणांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेडच्या हदगाव पोलीस स्थानकाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी पित्यासह पोलिसांनी आठ जणांना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींमध्ये मुलीच्या सावत्र आईसह तिला खरेदी करणाऱ्या आरोपींचाही समावेश आहे.

नांदेडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, “पीडित अल्पवयीन मुलीने तिच्या मावशीला फोन करून याबाबत माहिती दिली. त्यानंतर काही दिवसांपूर्वी तिच्या मावशीने काही नातेवाईकांच्या मदतीने साताऱ्यातील आरोपीच्या तावडीतून सुटका केली. पैशांसाठी वडिलांनी विकल्याचा आरोप मुलीनं केलाय. मुलीला सर्वात आधी राजस्थानच्या कोटामधील एका व्यक्तीला विकण्यात आलं. आरोपी कामाच्या शोधात औरंगाबादेत आला असताना त्याने मुलीला विकलं होतं. त्यामुळे हे प्रकरण औरंगाबाद पोलिसांना सोपवण्यात आलं आहे.”

कोटामध्ये आरोपींनी तिला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर वारंवार बलात्कार केला होता. त्यामुळे आजारी पडल्यानंतर आरोपींनी तिला पुन्हा हदगावला आणून सोडलं. त्यानंतर नंदूरबारच्या एका ४५ वर्षीय व्यक्तीला तिला पुन्हा विकलं. यासाठी तिच्या पित्याने हप्त्यात २ लाख रुपये घेतले होते. या माणसाने तिच्यावर ८ महिने बलात्कार केला. मात्र पैसे पूर्ण न दिल्याने तिच्या बापाने तिला परत आणलं.

तिसऱ्यांदा साताऱ्यातील एका ४० वर्षीय व्यक्तीला तिच्या बापाने तिला पुन्हा विकलं. त्यानेही तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप पीडित मुलीनं केलाय. साताऱ्यात असतानाच तिने तिच्या मावशीला घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं. त्यानंतर तिच्या मावशीने आरोपीच्या तावडीतून तिची सुटका केली आणि पोलिसांत तक्रार दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Father sold minor daughter thrice in 2 years girl raped by many shocking incident from nanded hrc