scorecardresearch

Premium

“संजय राऊतांविरोधात ४२० ची FIR दाखल करा” धमकी प्रकरणी मयूर शिंदेच्या अटकेनंतर नितेश राणेंची मागणी

संजय राऊत ४२० आणि खोटारडा आहे असंही वक्तव्य नितेश राणेंनी केलं आहे.

What Nitesh Rane Said?
नितेश राणेंनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

संजय राऊत यांना एक धमकी आली. ही धमकी ठार करण्याची होती. सुनील राऊत यांनी एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल केली होती. मी तेव्हाच बोललो होतो की मच्छराला मारण्यासाठी धमकीची काहीच गरज नाही. मात्र संजय राऊत हा ४२० असल्याने सगळ्याच बाबतीत खोटारडा आणि भंपक माणूस आहे. धमकी प्रकरणात मयूर शिंदेला अटक केली आहे. हा मयूर शिंदे कोण? सुनील राऊत यांचाच कार्यकर्ता आहे. त्यामुळे आता संजय राऊतांवर ४२० ची तक्रार दाखल झाली पाहिजे अशी मागणी नितेश राणेंनी केली आहे.

संजय राऊत आणि त्यांचा भाऊ सुनील राऊत एवढे भामटे आहे की स्वतःच्याच कार्यकर्त्याकडून स्वतःला धमकी देण्याचा प्रकार यांनी केला आहे. हे असं खोटं बोलूनच पोलीस संरक्षण घेऊन फिरतात. संजय राजाराम राऊत दाऊदपासून सगळ्यांची भाषा करतो. त्यामुळेच मी त्याला भांडुपचा देवानंद म्हणतो. कारण खोटं बोलणं आणि गद्दारी करणं यापेक्षा हा काही करत नाही. कार्यकर्त्याकडूनच धमकीचा फोन करायला लावायची, धोका आहे सांगायचं आणि जीवाला धोका आहे सांगायचं. त्यानंतर गृहमंत्री फडणवीसांवर टीका करायची हे याचं धोरण आहे असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

sukhbir singh badal
नांदेड गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या पुनर्रचनेनंतर शिरोमणी अकाली दलाचे थेट पंतप्रधान मोदींना पत्र, नेमकं राजकारण काय?
Asaduddin Owaisi Speech on Babri
मी बाबर, औरंगजेबाचा प्रवक्ता आहे का? ओवेसींचे राम मंदिरावर भाषण; म्हणाले, “बाबरी जिंदाबाद…”
narendra modi loksabha
काँग्रेसवर सडकून टीका, घराणेशाहीचे आरोप, विजयाचा विश्वास; १७ व्या लोकसभेतील पंतप्रधानांच्या शेवटच्या भाषणातील पाच मुख्य मुद्दे
thane mp shrikant shinde, shrikant shinde on ulhasnagar firing case
“कोण काय म्हणतो यापेक्षा सीसीटिव्ही फुटेजमधून सत्य लोकांसमोर…” खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांची गोळीबार प्रकरणावर पहिली प्रतिक्रिया

हे पण वाचा- संजय राऊत शकुनी मामा, राष्ट्रवादीत भांडणे लावली; भाजपचे आमदार नितेश राणे यांची टीका

संजय राऊत हा लवकरच तुम्हाला तुरुंगात दिसणार आहे. कैदी नंबर ८९५९ चा गणवेश घालून बाथरुमसाठी भांडताना दिसणार आहे. मी मागणी करतो की असल्या लोकांचं संरक्षण काढून टाका. पत्रकार मित्रांनाही सांगेन की याच्या बाजूने बातम्या देताना थोडी अधिकची माहिती घेतली पाहिजे. धमकी देणारा कोण आहे? याची माहिती घ्यायला हवी. संजय राऊत स्वतःच्या मालकाचा झाला नाही तो तुमचा आणि आमचा काय होणार? असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

हे पण वाचा “संजय राऊत धमकी प्रकरणात आदित्य ठाकरेंची चौकशी करा, कारण…”, नितेश राणेंची मागणी

मयुर शिंदे तुझा कार्यकर्ता आहे का? याचं उत्तर आधी महाराष्ट्राला दे. त्यानंतर तुझं इतर काही बोलण्यासाठी तोंड उघड असाही इशारा नितेश राणेंनी दिला आहे. मराठी माणसाला हिंदीत बोलायला सांगायचं आणि देशभरात तो कॉल रेकॉर्ड करुन व्हायरल करायचा. मी महाराष्ट्र पोलिसांना आणि सरकारला विनंती करतो की संजय राऊतसारख्या खोटारड्या माणसाची सुरक्षा काढावी आणि त्याच्याविरोधात ४२० ची तक्रार दाखल करा अशी मागणीही नितेश राणेंनी केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: File an fir of 420 against sanjay raut nitesh rane demand after the arrest of mayur shinde in the threat case scj

First published on: 15-06-2023 at 15:00 IST

आजचा ई-पेपर : महाराष्ट्र

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×