मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून राज्यात एसटीतील २,६०० हून अधिक चालक कम वाहक पदासाठीची भरती प्रक्रि या रखडली आहे. चालक कम वाहक पदाच्या उमेदवारांचे प्रशिक्षण होऊनही अनेक जण अद्यापही एसटीत रुजू होऊ शकलेले नाहीत. या पदाच्या उमेदवारांना सेवेत घेण्याचे महामंडळाकडून वारंवार आश्वासन दिले जात असून अनेकांनी विविध खासगी कं पन्यांमध्ये असलेली नोकरी सोडून एसटीतील या नोकरीसाठी प्रयत्न के ले. परंतु तीदेखील न मिळाल्याने या उमेदवारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

गेल्या वर्षी मार्च महिन्यापासून टाळेबंदी जाहीर करण्यात आल्याने एसटी महामंडळाची प्रवासी सेवा मोठय़ा प्रमाणात ठप्प झाली होती. त्यामुळे आर्थिक स्रोत पूर्णपणे थांबले होते. अशा वेळी अतिरिक्त खर्चाला लगाम घालण्याच्या उद्देशाने २०१६-१७ व २०१९ अंतर्गत निवड झालेल्या विविध संवर्गातील प्रशिक्षणार्थी उमेदवारांचे प्रशिक्षण व अंतिम निवड प्रक्रिया तात्पुरती खंडित करण्यात आली होती. एसटी महामंडळाची सेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्याने त्यावरील स्थगिती फेब्रुवारी २०२१ मध्ये उठवली होती.

मात्र करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा टाळेबंदी लागल्याने चालक कम वाहकांची भरती प्रक्रिया पुन्हा थांबली. असे एकू ण २,६०० हून अधिक उमेदवार असून यात काहींचे प्रशिक्षण पूर्ण होऊन अंतिम चाचणी बाकी आहे. तसेच अंतिम चाचणीही होऊन सेवेत रुजू होण्याच्या प्रतीक्षेत असलेलेही उमेदवार आहेत. कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, अमरावती, बुलढाणा, धुळे, जळगाव, सोलापूर, सांगली, नागपूर, भंडारा, ठाणे या विभागातील सर्वाधिक चालक कम वाहक पदाचे उमेदवार आहेत.  

चालक तथा वाहक या पदासाठी ज्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, ते इतर ठिकाणी नोकरी करीत होते. ते नोकरी सोडून सरकारी नोकरी म्हणून एसटीमध्ये भरती झाले. टाळेबंदीमुळे अनेक खासगी वाहतूक कंपन्यांचा व्यवसाय अडचणीत आणि ते व्यवसाय बंद करून बसले आहेत. आता या चालक कम वाहकाना रोजगार मिळणे मुश्कील होऊन बसले आहे. त्यांना एसटी महामंडळाने तात्काळ कामावर घेतले पाहिजे.

– श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेस</strong>

वसई-विरार पालिके त कं त्राटी चालक म्हणून कार्यरत होतो. ही नोकरी सोडून एसटीतील चालक कम वाहक पदाच्या नोकरीसाठी प्रयत्न के ला. प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. पण अद्यापही रुजू के लेले नाही. महामंडळाने थांबण्याची सूचना के ली आहे. मी मूळचा कोल्हापूरचा आहे. नोकरी न मिळाल्याने आता कोल्हापुरात उसाची गाडी चालवून घरखर्च भागवतो.

– अजय कांबळे (चालक कम वाहक पदाचा उमेदवार, वय २९)

चालक कम वाहक पदाच्या भरतीतील उमेदवारांना सेवेत घेण्यासंदर्भात लवकरच एसटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय होईल.

– शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ