गुंतवणुकीच्या आमिषाने गुंतवणूकदारांची ३०० कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट खासगी वित्तीय संस्थेच्या संचालकांसह कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी सेल्वाकुमार नडार (रा. कोंढवा खुर्द) याच्यासह साथीदारांच्या विरुद्ध बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुंतवणूकदारांची आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सचिन पुरुषोत्तम पवार (रा. वाघोली) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी नडार आणि साथीदारांनी अष्टविनायक इन्व्हेस्टमेट नावाने खासगी वित्तीय संस्थेचे कार्यालय लष्कर भागातील न्यूक्लिअस माॅल परिसरात सुरू केले होते.

dawood ibrahim marathi news, extortion dawood ibrahim marathi news
खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
Shareholders approve Voda Idea Rs 20000 crore fund raising
व्होडा-आयडियाच्या २०,००० कोटींच्या निधी उभारणीला भागधारकांची मंजुरी
fraud with 628 investors
गुंतवणुकीच्या नावाखाली ६२८ गुंतवणूकदारांची ५७९ कोटींची फसवणूक, आरोपी सनदी लेखापालाला ८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

हेही वाचा >>> नॅक मूल्यांकनासाठी ‘परिसस्पर्श’ योजना, १७५ उच्च शिक्षण संस्थांमार्फत प्रत्येकी पाच महाविद्यालयांना नॅक मूल्यांकनाबाबत मार्गदर्शन 

नडार आणि साथीदारांनी गुंतवणुकीवर परतावा देण्याचे आमिष दाखविले होते. आरोपी नडार आणि खासगी वित्तीय संस्थेतील कर्मचाऱ्यांनी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी योजना जाहिर केल्या होत्या.

काही जणांना त्वरित कर्ज उपलब्ध करुन देण्याचे आमिष दाखविले होते. कर्ज मंजुरी प्रक्रियेसाठी नडार याने पैसे उकळले होते. तक्रारदार पवार यांचा विश्वास संपादित करुन त्यांना कर्ज उपलब्ध करुन दिले होते. तक्रारदाराच्या खात्यावर जमा झालेली ४० लाख ८९ हजार १५२ रुपये नडारने अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटच्या खात्यात जमा करुन घेतली. आरोपींनी पवार यांच्यासह २०० जणांकडून वेगवेगळी कारणे सांगून ३०० कोटी रुपये उकळल्याची माहिती प्राथमिक तपासात मिळाली आहे. या प्रकरणी फसवणूक, महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम तीन नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर तपास करत आहेत.

हेही वाचा >>> पीएमपीची भाडेवाढ टळण्याची शक्यता, पीएमआरडीए देणार संचलन तूट

फसवणुकीचे जाळे

अष्टविनायक इन्व्हेस्टमेंट या खासगी वित्तीय संस्थेतील प्रतिनिधी गुंतवणूकादारांकडून पैसे घेऊन ते शेअर बाजार, कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूक करायचे. गुंतवणूक करण्यात आलेल्या रक्कमेतून मिळालेल्या नफ्यातील काही हिस्सा गुंतवणूकादारांना दिला जायचा तसेच एखाद्याला कर्ज उपलब्ध करुन दिल्यास काही हप्ते फेडले जायचे. ज्यांनी गृहकर्ज, वाहन कर्ज घेतले आहे. अशा कर्जदारांशी अष्टविनायक इन्व्हेस्टमेंटच्या प्रतिनिधीकडून संपर्क साधला जात होता.