scorecardresearch

वरळी सदनिका प्रकरणी किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल, अडचणी वाढणार?

मुंबईच्या माजी महापौर तथा शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

वरळी सदनिका प्रकरणी किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल, अडचणी वाढणार?
किशोरी पेडणेकर (संग्रहित फोटो)

मुंबईच्या माजी महापौर तथा शिवसेनेच्या (ठाकरे गट) नेत्या किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर वरळी येथील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पातील सदनिका लाटल्याचा आरोप आहे. भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदा घेत वेगवेगळ्या कागदपत्रांच्या आधारे हा आरोप केलेला आहे. याच आरोपाप्रकरणी आता किशोरी पेडणेकर यांच्यासह अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>> संजय राऊत खासदार कोणामुळे झाले? नारायण राणेंचा मोठा दावा; म्हणाले, “हे पाप तर…”

याबाबतची अधिक माहिती भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ‘किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात झोपडपट्टीवासीयांची घरे काबीज करण्याच्या आरोपाखाली ४२०, ४१९, ४६५, ४६८, ४७१ कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे,’ असे किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.

हेही वाचा >>> पनवेल : धक्कादायक! जन्मदात्या आईने नवजात अर्भकाला शौचालयातून दिले फेकून, उलवे येथील घटना

किशोरी पेडणेकर यांच्यावर काय आरोप आहे?

किशोरी पेडणेकर यांच्यावर वरळी येथील गोमाता जनता एसआरएमध्ये ६ गाळे (सदनिका) हस्तगत केल्याचा आरोप आहे. या सदनिका वर्षानुर्षे पेडणेकर त्यांच्या ताब्यात आहेत, असा दावा केला जातो. तर दुसरीकडे किशोरी पेडणेकर यांनी हा आरोप फेटाळून लावलेला आहे. “दोन वर्षांपूर्वी सर्व माहिती दिलेली असतानाही वारंवार तीच कागदपत्रं दाखवून आरोप केला जातोय. मी कायदेशीर लढाई लढणार आहे, सत्य सर्वांना कळेलं. आग नाही पण धूर काढण्याची पद्धत यांनी अवलंबली आहे. प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्यासह गेल्यानंतर गेल्यानंतर सगळे आरोप थांबले आहेत. त्यामुळे लोकांना सगळं माहिती आहे, असे स्पष्टीकरण किशोरी पेडणेकर यांनी याआधी दिलेले आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2023 at 09:55 IST

संबंधित बातम्या