५ कामगार जखमी; भिषण स्फोटांनी महाड हादरले

अलिबाग: महाड एमआयडीसीतील मल्लिका स्पेशालिटी या कारखान्यात आजसकाळी १०: ३० च्या सुमारास आग लागली. कारखान्यातील इथिलिन ऑक्साईड प्लॉट हि आग लागली. या आगी दरम्यान स्फोट देखील झाले. यावेळी मल्लकमधील दोन तर शेजारी असलेल्या प्रिव्ही कंपनीमध्ये तीन जण, श्रीहारी कंपनीत चार जण आणि मल्लक मध्ये चार जण असे आकरा जण या आग आणि स्फोटामध्ये जखमी झाले आहेत. तब्बल दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळाले असले तरी आग पुर्णपणे विझलेली नाही. या आगीच्या वेळी झालेल्या स्फोटचा आवाज सुमारे २० किलोमिटर पर्यंत गेला.

अजुनही स्फोट होण्याची शक्यता असल्याने परीसरातील कंपन्यांमधील कामगारांना बाहेर सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. धुराचे लोळ आणि स्फोटांचा आवाज दुर पर्यंत ऐकायला येत असल्याने महाड परीसरात खळबळ उडाली. या आगीमुळे मल्लक कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. आगीवर नियंत्रणात मिळले असुन आग संपुर्ण विझल्यानंतर आग कशामुळे लागली आणि नुकसान किती झाले याची अधिकृत माहिती कंपनी प्रशासनाकडुन देण्यात येणार आहे.

Pune, gun firing, hotel,
पुणे : शहरात गोळीबारीची सलग चौथी घटना, हॉटेलमध्ये गोळीबार
India Wholesale Inflation Reaches 3 Month High
घाऊक महागाई दर मार्चमध्ये किंचित वाढून तिमाही उच्चांकावर
taiwan earthquake
तैवानमध्ये भूकंपात बेपत्ता लोकांची शोधमोहीम अद्याप सुरू
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी