सांगलीतील बापट मळ्यात असणा-या हरिप्रिया अपार्टमेंटमध्ये गुरुवारी पहाटे आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या संदर्भात कोणतीही तक्रार दाखल नसल्याने नुकसानीचा अंदाज करता आलेला नाही. आगीचे कारणही अज्ञातच आहे.
हरिप्रिया अपार्टमेंटच्या तळ मजल्याला गुरुवारी पहाटे २.३० वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. आगीमध्ये तळ मजल्यावर ठेवण्यात आलेल्या दोन दुचाकी हानीग्रस्त झाल्या. याशिवाय अपार्टमेंटमध्ये करण्यात आलेले विद्युत वायिरग आणि जल निस्सारनच्या पाईप्स जळून खाक झाल्या आहेत.