scorecardresearch

राकेश झुनझुनवाला यांच्या ‘अकासा एयरलाईन्स’च्या विमानाचे मुंबईतून पहिले उड्डाण

राकेश झुनझुनवाला यांची मालकी असलेल्या अकासा एयरलाईन्सच्या पहिल्या विमानाने रविवारी मुंबई-अहमदाबाद मार्गादरम्यान पहिले उड्डाण केले.

राकेश झुनझुनवाला यांच्या ‘अकासा एयरलाईन्स’च्या विमानाचे मुंबईतून पहिले उड्डाण
फोटो सौजन्य – अकासा एयरलाईन्स अधिकृत ट्वीटर खाते

राकेश झुनझुनवाला यांची मालकी असलेल्या अकासा एयरलाईन्सच्या पहिल्या विमानाने रविवारी मुंबई-अहमदाबाद मार्गादरम्यान पहिले उड्डाण केले. यावेळी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य एम सिंधिया आणि राज्यमंत्री जनरल विजय कुमार सिंग (निवृत्त) यांनी विमानाला हिरवा कंदील दिला.

हेही वाचा – इस्त्रोच्या नव्या प्रक्षेपकाचे-रॉकेटचे यशस्वी उड्डाण, पण उपग्रह प्रक्षेपणाच्या यशाबद्दल संदिग्धता कायम

दरम्यान, 22 जुलै रोजी अकासा एअरलाईन्सतर्फे अहमदाबाद, बेंगळुरू, मुंबई आणि कोचीसाठी तिकीट बुकिंग सुरू केले होते. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि अहमदाबाद दरम्यान २८ साप्ताहिक उड्डाणे सुरू करण्यात आली आहे. तर १३ ऑगस्टपासून बंगळूरू आणि कोच्ची दरम्यान अतिरिक्त २८ साप्ताहिक उड्डाणे सुरू करण्यात येणार आहे. बंगळूरू आणि कोच्चीसाठी तिकीट बुकींसुद्धा सुरू झाली आहे.

”आज आम्हाल खूप आनंद होतो आहे. कारण अखेर आज आमच्या विमानाने भारतातील आकाशात उड्डाण घेतले आहे. आम्ही आमच्या ग्राहकांना प्रामाणिकपणे सेवा देण्याचा प्रयत्न करू. मला खात्री आहे की ग्राहकांनाही आमची विमानसेवा आवडेन”, असी प्रतिक्रिया आकासा एअरचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी विनय दुबे यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: First flight of akasa airline has takes off from mumbai to ahmedabad spb