रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नौका गुरुवारी सायंकाळी उशिरा बुडाली. अद्याप समुद्र खवळलेला असल्याने अशा खराब वातावरणामुळे नौकेत पाणी भरल्याने ही दुर्घटना घडली. नौकेवरील दोन खलाशांना मत्स्य विभागाने कोस्टगार्डच्या हेलिकॉप्टरने रेस्क्यू करत त्यांचे प्राण वाचवले.
जिल्ह्यात काही ठिकाणी वादळी वाऱ्याचा जोर वाढला आहे. समुद्रालगतच्या भागाना या वादळी वाऱ्याचा चांगलाच फटका बसत आहे. समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे समुद्र देखील खवळला आहे. पाण्याला करंट असल्याने याचाच फटका पूर्णगड समुद्रात मासेमार करण्यासाठी गेलेल्या नौकेला बसला आहे. पूर्णगड समुद्रात बुडालेली नौका विनोद भागवत नामक मालकाची असल्याचे सांगण्यात येत आहे. ही नौका लोखंडी होती असे येथील स्थानिक ग्रामस्थांनी सांगितले. या मासेमारी नौकेवर दोन खलाशी होते.
रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड समुद्रात मासेमारीसाठी गेलेली नौका गुरुवारी सायंकाळी उशिरा बुडाली. नौकेवरील दोन खलाशांचे तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरद्वारे बचाव कार्य करत प्राण वाचवण्यात आले.#ratnagiri #coastguard #rescue #sea #boatsink pic.twitter.com/RtwY9dT8LL
— LoksattaLive (@LoksattaLive) August 30, 2024
हेही वाचा…अलिबाग : फसवणूकीसाठी इंटरनेट कॉलिंग अँपचा वापर,बोगस कॉल सेंटर प्रकरणातील तपासात माहिती आली समोर
पूर्णगड समुद्रात काही अंतरावर ही नौका मासेमारी करत होती. यावेळी समुद्रातील वातावरण खराब झाल्याने बोटीत पाणी भरण्यास सुरुवात झाली. बोटीत पाणी भरण्यास सुरुवात होताच बोटितील खलाशांनी तात्काळ बोटीवर चढून मदतीसाठी आरडाओरड सुरू केली. त्यानंतर लगेचच मदतीसाठी मत्स्य विभागाशी संपर्क करण्यात आला. त्यानंतर मत्स्य विभागाचे अधिकारी आनंद पालव यांनी बोटीवरील खलाशांना वाचवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या मदतीसाठी कोस्टगार्डच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्यात आला. यानंतर लगेच कोस्टगार्डचे हेलिकॉप्टर येथे दाखल झाले आणि नौकेवरील दोघा खलाश्यांना रेस्क्यू करुन बाहेर काढण्यात आले.