scorecardresearch

Premium

पंधरा लाख रुपयांची वीज चोरी उघडकीस

पुणे येथील विद्युत वितरण कंपनीचे भरारी पथक वाईच्या औद्योगिक वसाहतीत तपासणी करत असताना त्यांना या वीज चोरीची माहिती मिळाली.

power theft by reliance enterprises,
पंधरा लाख रुपयांची वीज चोरी (संग्रहित छायाचित्र) ; फोटो- लोकसत्ता टीम

वाई:वाईच्या औद्योगिक वसाहतीत रिलायंस इंन्टरप्रायजेस या कंपनी वर पुणे येथील विद्युत वितरण कंपनीच्या भरारी पथकाने छापा टाकुन ८१ हजार ४३४  युनिटची वीज चोरी करुन तब्बल १४ लाख ७२ हजार ५६० रुपयांची वीज चोरी उघडकीस आणली. या प्रकरणी तीन जणांवर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

पुणे येथील विद्युत वितरण कंपनीचे भरारी पथक वाईच्या औद्योगिक वसाहतीत तपासणी करत असताना त्यांना या वीज चोरीची माहिती मिळाली. रिलायंस इंन्टरप्रायजेस या कंपनीच्या मीटरची तपासणी करत असताना जोडणी वायरमध्ये छेड छाड करुन ८१ हजार ४३४ युनिटची वीज चोरी करुन तब्बल १४ लाख ७२ हजार ५६० रुपयांची वीज चोरी उपकार्यकारी अभियंता विशाल बाळकृष्ण कोष्टी आणि (तंत्रज्ञ ) पवण चव्हाण यांनी इतर सहकारी अधिकारी वर्गाला सोबत छापा टाकुन उघडकीस आणली. तपासणी करत असताना मे २०२२ पासुन ते एप्रिल २०२३ पर्यंत पुर्ण वर्षभर वेळो वेळी मीटरमध्ये छेड छाड करुन ८१ हजार ४३४ युनिटची वीज चोरी करुन तब्बल १४ लाख ७२ हजार ५६० रुपयांची वीज चोरी केल्याचे उघडकीस आल्याने कंपनी चालकासह कंपनीचे जागा मालक असलेले मनोज सुदाम तरटे व  वीज वापरणारे विक्रम वसंत एरंडे. त्रंबक वसंत एरंडे या तिघांवर वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालाआहे.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
eknath shinde bjp flag
“…अन्यथा भाजपात प्रवेश केला असता”, शिंदे गटातील मंत्र्याचं मोठं विधान

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Flying squad expose power theft of rs 15 lakh by reliance enterprises zws

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×