scorecardresearch

वन सर्वेक्षक १३ हजारांची लाच घेताना सापळ्यात

तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला.

bribe
( संग्रहित छायचित्र )

नांदेड : आई, भाऊ आणि मित्राच्या शेतामध्ये असलेली सागवानाची झाडे तोडण्यासाठी परवानगी आणि झाडे तोडल्यानंतर आवश्यक परवानग्या देण्यासाठी १३ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर उपवनसंरक्षण कार्यालयातील वन सर्वेक्षक गणेश मज्जनवार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी अटक केली आहे.

तक्रारदाराला लाच द्यावयाची नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. १० हजार रुपये लाच देण्याचे ठरल्यानंतर 5 हजार रुपये मज्जनवार यांनी पूर्वी स्वीकारले होते. उर्वरीत पाच हजारामध्ये तडजोड करण्यासाठी तक्रारदार मज्जनवार यांच्याकडे गेले असता त्यांनी वाहतूक परवाना देण्याचे काम वाढले असल्याचे कारण सांगून आणि आणखी तीन हजार रुपये लाचेची मागणी करून एकूण १३ हजार रुपये स्वीकारले. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजकुमार शिंदे, अपर पोलीस अधिक्षक धर्मसिंग चव्हाण, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक समीर शेख यांच्या पथकाने केली..

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Forest surveyor caught taking bribe of rs 13 000 amy