घटस्थापनेचा मुहूर्त साधत जिल्ह्यातील सर्वच विधानसभा मतदारसंघात गुरुवारी उमेदवारी अर्ज मोठय़ा संख्येने दाखल झाले. आज उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये माजी मंत्री आमदार विनय कोरे, शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष उल्हास पाटील, कर्णसिंह गायकवाड, सत्यजित कदम आदी प्रमुखांचा सहभाग होता. शुक्रवार व शनिवार हे अखेरचे दोन दिवस असल्याने अर्ज दाखल करण्यास झुंबड उडाल्याचे चित्र या दोन दिवसात पाहायला मिळणार आहे.
विधानसभा निवडणूकीसाठी २० सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. तथापि, पितृपक्ष असल्याने प्रमुख उमेदवारांनी अर्ज भरण्याचे टाळले होते. गुरुवारपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली. घटस्थापनेचा मुहूर्त साधत अर्ज दाखल केले गेले. शाहूवाडी मतदारसंघात सर्वच प्रमुख उमेदवारांनी आज अर्ज सादर केले. त्यामध्ये जनसुराज्य शक्तीपक्षाचे विनय कोरे, शिवसेनेचे सत्यजित पाटील, दिवंगत आमदार संजयसिंह गायकवाड यांचे सुपुत्र कर्णसिंह गायकवाड व भाग्यश्री गायकवाड यांनी अर्ज सादर केले. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेस पक्षाची उमेदवारी सत्यजित कदम यांना जाहीर झाली असली, तरी त्यांनी आज अपक्ष अर्ज सादर केला. त्यांच्या समवेत कोणीही प्रमुख काँग्रेस कार्यकर्ता उपस्थित नव्हता. काँग्रेस पक्षाचा एबी फॉर्म उपलब्ध झाल्यानंतर पक्षामार्फत उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
शिरोळ मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष उल्हास पाटील, तसेच सामाजिक कार्यकत्रे प्रमोद पाटील यांनी अर्ज सादर केला. हातकणंगले या राखीव मतदारसंघात माकपचे कॉ. भरमा कांबळे यांच्यासह दोन अपक्षांनी अर्ज भरले. कागल विधानसभा मतदारसंघात अमर िशदे, बाळासाहेब पाटील, अविनाश मगदूम व शामगोंड पाटील या चौघांनी अर्ज दाखल केले. तथापि, या मतदारसंघातून माजी दिवंगत मंत्री बाबा कुपेकर यांचे बंधू बाळासाहेब कुपेकर यांनी अर्ज नेला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. लक्षवेधी ठरलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात िहदू महासभेचे मारुती मिरजकर, गोपाळ कांबळे, महाराष्ट्र विकास आघाडीचे संदीप संकपाळ यांनी अर्ज दाखल केला. विधानसभेच्या आखाडय़ात संत महंतांनी उडी घेण्यास सुरुवात केल्याचे दिसू लागले असून त्याची प्रचिती गुरुवारी इचलकरंजी मतदारसंघात आली. िलगायत समाजाचे जगद्गुरू बसविलग स्वामी यांनी अर्ज दाखल केला.

Dhangekar Kolhe and supriya Sule sat in front of the stage in the hot sun.
मोदींना सत्तेचा उन्माद! ; शरद पवार यांचा आरोप; पुणे जिल्ह्यातील मविआ उमेदवारांचे अर्ज दाखल
19 april 2024, voting in nagpur, 80 km distance , pm narendra modi, public meeting, wardha, Covert Campaigning, Polling Day , nagpur news, wardha news, narendra modi in wardha, lok sabha 2024, election campaign, marathi news, politics news,
नागपूरमध्ये उद्या मतदान, ८० कि.मी.वर मोदींची सभा
amit shah
महाराष्ट्राला काय दिले, पवारांनीच हिशेब द्यावा! केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची टीका
hatkanangale lok sabha
कोल्हापुरात प्रचाराचा धुरळा; हातकणंगलेत वारे थंडच