माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांना करोनाची लागण

फेसबुक पोस्टद्वारे दिली माहिती

सदाभाऊ खोत

माजी कृषीमंत्री सदाभाऊ खोत यांना करोनाची लागण झाली आहे. सदाभाऊ खोत यांची करोना चाचणी पाॅझिटिव्ह आली असून त्यांनी स्वत: याबद्दल माहिती दिली. ते होम क्वॉरनटाईन झाले आहेत. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली.

‘माझी कोवीड १९ चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मी आता उत्तम आहे, व मी क्वॉरनटाईन झालो आहे. तरी आपण आपली व आपल्या कुटंबाची काळजी घ्या. गणेशरायाच्या व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने लवकरच आपल्या सेवेत हजर राहीन’ अशी फेसबुक पोस्ट लिहून सदाभाऊ खोत यांनी करोनाची लागणी झाल्याची माहिती दिली.

सदाभाऊ खोत हे करोनाकाळातही सक्रियपणे काम करत होते. सांगली येथे रयत क्रांती संघटनेच्या आंदोलनताही ते सहभागी झाले होते. इस्लामपूर येथे जिल्हा कोविड रुग्णालयाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासोबत सदाभाऊ खोत ही उपस्थित होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Former agriculture minister sadabhau khot coronavirus positive abn

ताज्या बातम्या