scorecardresearch

जायकवाडीच्या पाण्यासाठी आंदोलन; माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, काँग्रेस आमदारसह शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल

रस्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला म्हणून वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे

former health minister rajesh tope congress mla protesters booked for agitation over jayakwadi water
जायकवाडीच्या पाण्यासाठी आंदोलन; माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे, काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल, अमरसिंह पंडित यांच्यासह शेकडो आंदोलकांवर गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर – नाशिक, अहमदनगरमधून अडवून धरलेले मराठवाड्याच्या हक्काचे ८.४ टिएमसी पाणी सोडण्याच्या मागणीसाठी जालना रोडवरील आकाशवाणीजवळच्या गोदावरी विकास महामंडळासमोर तीन तास रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) राजेश टोपे, अजित पवार गटाचे माजी आमदार अमरसिंह पंडित, काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल आदींवर जवाहरनगर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील नेत्यांसह धनश्री तडवळकर, पांडुरंग तांगडे पाटील यांच्यासह ३१ जणांवर व अनोळखी शंभर ते दीडशे आंदोलकांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार गोकुळ बाबूलाल लोदवाल यांनी तक्रार दिली आहे. रस्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केला म्हणून वरील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

mumbai District office bearers and district presidents meeting
विरोधकांकडे असलेले मतदारसंघ जिंकण्यासाठी प्रयत्नांची शर्थ; तावडे
ncp mla sumantai patil on indefinite hunger strike in front of collector office over water issue
सांगली: टेंभूच्या पाण्यासाठी आमदार सुमनताई पाटलांचे उपोषण
Vanchit Aghadi march sangli
सांगली : कंत्राटी नोकरभरतीच्या विरोधात वंचित आघाडीचा मोर्चा
pankaja munde parikrama yatra
पंकजा यांच्या स्वागतासाठी सोलापूरमध्ये फडणवीस समर्थकच आघाडीवर

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former health minister rajesh tope congress mla protesters booked for agitation over jayakwadi water zws

First published on: 20-11-2023 at 23:46 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×