शक्ती कायदा राज्यातून राष्ट्रपतीकडे मान्यतेसाठी गेला आहे. ज्यावेळेस मान्यता मिळेल तेव्हा तो अंमलात येईल. त्यात काही त्रुटी आहेत. त्यातूनही मार्ग निघेल. मात्र. लव जिहाद हा विषय राजकीय असल्याने त्यासाठी कायदा करण्याची गरज नसल्याचे वक्तव्य माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले आहे.

हेही वाचा- “भाजपाच्या काही लोकांचे मेंदू किड्या-मुंग्यांचे, तिथे काय लायकीचे..”, चित्रा वाघ यांच्यावर संजय राऊतांचा हल्लाबोल!

Ajit Pawar, seat allocation
“जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल”, अजित पवारांनी व्यक्त केला विश्वास; म्हणाले, “युती असो किंवा महाविकास आघाडी…”
Sharad Pawars appeal to the youth to question to government regarding jobs and employment
आश्वासन वर्षाला दोन कोटी रोजगारांचे, प्रत्यक्षात नऊ वर्षांत सात लाखच नोकऱ्या; सरकारला जाब विचारण्याचे शरद पवार यांचे तरुणाईला आवाहन
nagpur, Vijay Wadettiwar, caste, hate, defaming, congress, lok sabha 2024, chandrapur,
आमच्यातील काही स्वार्थी लोक माझ्या विरोधात विषारी प्रचार करताहेत!…विजय वडेट्टीवार यांचा रोख कुणावर?
Why Protests in Hong Kong over New National Security Law Approved by Legislative Council Hong Kong
चीनकडून हाँगकाँगची गळचेपी? नवीन सुरक्षा कायद्याविषयी जगभर निषेधसूर का?

एकीकडे राज्यात लव जिहादच्या विरोधात मोर्चे निघतायत. हा कायदा केला जावा यासाठी आमदार नितेश राणे यासाठी आग्रही असताना दुसरीकडे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील मात्र घटनेमध्ये कोठेही विषय नाही. त्यामुळे या विरोधात कायदा करणे घटनेशी कितपत सुसंगत आहे याबाबत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. शक्ती कायदा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे गेला आहे. त्यामध्ये काही त्रुटी असल्याचे शासनास कळविले आहे. त्या त्रुटी दूर केल्या तर राज्यात याबाबत एक चांगला कायदा येऊ शकेल असेही वळसे पाटील म्हणाले.

हेही वाचा- VIDEO: साताऱ्यात कुमठे ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात आमदार शशिकांत शिंदे-महेश शिंदेंच्या कार्यकर्त्यांत धुमचक्री

रयत शिक्षण संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन केले होते. त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी व संस्थेच्या विविध कामांसाठी वळसे पाटील साताऱ्यात आले होते.या कर्मचाऱ्यां नी हे आंदोलन मागे घेतले.यावेळी ते माध्यमांशी बोलत होते