scorecardresearch

Premium

विश्वासघात! लिव्ह इन पार्टनरने पॉर्न साईटवर अपलोड केला विवाहित महिलेचा व्हिडिओ

पुण्यात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने तिच्या माजी लिव्ह-इन पार्टनर विरोधात समर्थ नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

प्रतिनिधिक छायाचित्र
प्रतिनिधिक छायाचित्र

पुण्यात राहणाऱ्या एका विवाहित महिलेने  माजी लिव्ह-इन पार्टनर विरोधात समर्थ नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिला ज्या पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती त्या व्यक्तीने दोघांचा प्रणयाचा जुना व्हिडिओ सोशल मीडिया आणि पॉर्न साईटवर अपलोड केला. महिलेला जेव्हा परिचितांकडून या व्हिडिओ क्लिप संदर्भात समजले तेव्हा तिने तडक समर्थ नगर पोलीस स्टेशन गाठून लिव्ह इन पार्टनर विरोधात तक्रार दाखल केली.

आरोपी मूळचा गोव्याचा आहे. महिला पुण्यात रास्ता पेठ भागात राहते. तक्रारदार महिला आणि आरोपी चार वर्ष लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. दोघे रास्ता पेठ भागात एक फ्लॅटमध्ये रहायचे अशी माहिती पोलिसांनी दिली. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना दोघांमध्ये परस्पर सहमतीने शरीरसंबंध होते. मूळचा गोव्याचा असलेला हा लिव्ह इन पार्टनर नोकरीच्या शोधात पुण्यात आला होता असे महिलेने तिच्या एफआयआरमध्ये म्हटले आहे.

Alexei Navalny Death
अलेक्सी नवाल्नींची शक्ती अन् प्रेरणास्थान राहिलीय ‘युलिया; पतीच्या मृत्यूनंतर पत्नीची पहिली पोस्ट चर्चेत
A video of police lathicharge on protesters in Mumbai is being shared as Haldwani violence.
Fact Check : लाठीचार्जचा व्हायरल व्हिडिओ उत्तराखंडमधील हलद्वानीचा नव्हे तर मुंबईतील घाटकोपरचा! जाणून घ्या काय आहे सत्य?
pune, police, suspended, Sassoon hospital, Accused, escapes, Sharad Mohol, threatens, wife,
पुणे : सराईत गुन्हेगार शरद मोहोळच्या पत्नीला धमकी देणाऱ्या आरोपीचे ससूनमधून पलायन…दोन पोलीस निलंबित
Mark Boucher Explains Rohit Sharma Mumbai Indians Captaincy sport news
रोहितवरील दडपण कमी करण्यासाठी नेतृत्वबदल! मुंबई इंडियन्सचा मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरचे स्पष्टीकरण

एकत्र रहात असताना त्याने मोबाइल फोन वापरुन दोघांच्या लैंगिक संबंधांची क्लिप बनवली होती. काही महिन्यांपूर्वी या महिलेने दुसऱ्या पुरुषासोबत लग्न केले. त्यावेळी हा लिव्ह इन पार्टनर पुन्हा गोव्याला निघून गेला. काही काळापूर्वी आरोपीने पॉर्न साईट आणि सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड केला असे पोलिसांनी सांगितले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ अपलोड करण्यासाठी त्याने महिलेचे बनावट अकाऊंट बनवले. गोव्यामधून ही क्लिप अपलोड झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Former live in partner uploaded intimate video clip on porn site women file complaint

First published on: 20-09-2018 at 14:51 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×