मुंबईच्या महापौरपदी आज भाजपाच्या रितू तावडे विराजमान झाल्या आहेत. त्यांच्या औपचारिक निवडीसाठी आज खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महापालिकेच्या सभागृहात आले होते. यावेळी त्यांनी मुंबईचा महापौर मराठीच होणार, हिंदू होणार हे मी म्हणालो होतो, असं म्हटलंय. यासह राज्यात आज कोण काय काय म्हणालंय हे पाहुयात.
“सलमानमध्ये नकार देण्याची हिंमत नव्हती”; RSS कार्यक्रमावरून अबू आझमींचा आरोप
मुंबईत ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (आरएसएस) शताब्दी कार्यक्रम पार पडला. यामध्ये बॉलिवूड स्टार सलमान खान यानेही उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमानंतर महाराष्ट्रातील समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते अबू आझमी सलमानच्या उपस्थितीवर भाष्य केले आहे. या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी त्याच्यावर दबाव होता, असा दावा आझमी यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या सूचना नाकारण्याचे धाडस त्याच्यामध्ये नव्हते, असंही ते म्हणाले.
‘राज ठाकरे पंतप्रधान मोदींना जास्तच घाबरलेले दिसतात’, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी डिवचलं
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना डिवचले आहे. भगतसिंह कोश्यारी आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुंबईतील व्याख्यानावर राज ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेबाबत प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देत असताना कोश्यारी यांनी राज ठाकरेंना डिवचत त्यांच्यावर टीका केली.
“माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला, विरोधकांनी भाजपाला हलक्यात घेण्याची चूक केली” निकालानंतर पालकमंत्री जयकुमार गोरेंची टोलेबाजी
माळशिरसमध्ये बघा, कुठल्या पद्धतीचे वातावरण आहे.ज्या पद्धतीने भाजपाला मत मिळाली आहे. ते बघून भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण झाली. जे मला गुंड म्हणत आहेत. ते सर्वात मोठे गुंड आहेत. माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला होता.असा गंभीर आरोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला. तर विरोधकांनी भाजपला हलक्यात घेतल्याची चूक केली आणि ती महागात पडली असा टोलाही गोरे यांनी लगाविला.
CM Devendra Fadnavis : “अजित पवार विमान अपघात तपासासाठी मीच केंद्राला सर्वांत आधी पत्र लिहिलं”, रोहित पवारांच्या दाव्यांवर मुख्यमंत्र्यांचं उत्तर!
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनावर त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी शंका उपस्थित केली आहे. हा अपघात नसून घातपातच आहे, असा त्यांचा दावा असून याबाबत त्यांनी काल (१० फेब्रुवारी) सविस्तर माहिती पत्रकारांना दिली. यावर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे. मुंबई महापालिकेत आज महापौर पदाची निवड झाली, यावेळी ते मुंबई महापालिकेच्या सभागृहात हजर होते. तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Anand Mahindra: “हे पाहून आनंद झाला”, उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी केले पुणे महानगरपालिकेच्या कामाचं कौतुक
पुणे महानगरपालिकेने शहरातील पदपथांच्या (फुटपाथ) दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. शहरातील नागरिकांना अधिक सुरक्षित आणि चालण्यायोग्य पदपथ मिळावेत यासाठी पालिकेकडून सध्या दुस्तीचे काम हाती घेतले आहे. याबाबतची माहिती पालिकेने शेअर करताच उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी पालिकेच्या या कामाचे कौतुक केले आहे. “हे पाहून आनंद झाला”, अशा शब्दात महिंद्रा यांनी पालिकेच्या कामाचे कौतुक केले.
“माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला, विरोधकांनी भाजपाला हलक्यात घेण्याची चूक केली” निकालानंतर पालकमंत्री जयकुमार गोरेंची टोलेबाजी
पंढरपूर : माळशिरसमध्ये बघा, कुठल्या पद्धतीचे वातावरण आहे.ज्या पद्धतीने भाजपाला मत मिळाली आहे. ते बघून भाजपा कार्यकर्त्यांना मारहाण झाली. जे मला गुंड म्हणत आहेत. ते सर्वात मोठे गुंड आहेत. माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला होता.असा गंभीर आरोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला. तर विरोधकांनी भाजपला हलक्यात घेतल्याची चूक केली आणि ती महागात पडली असा टोलाही गोरे यांनी लगाविला.
