Sambhaji Raje Chhatrapati on Chhaava Trailer: अभिनेता विक्की कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. यातील काही दृश्यांवर आता आक्षेप घेतला जात आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई एकत्र नृत्य करताना दाखवले आहेत. यावरून सोशल मीडियासह काही संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत आहेत. या आक्षेपार्ह प्रसंगावर आता माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपली भूमिका मांडली आहे.

माध्यमांशी संवाद साधत असताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले, “छावा या नावाने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर चित्रपट येत आहे. ही आनंदाची बातमी आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास यातून पुढे येईल. चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांची टीम मला येऊन भेटली होती. त्यांनी ट्रेलरची क्लिप मला दाखवली. पण मी त्यांना संपूर्ण चित्रपट दाखविण्याची मागणी केली होती. तसेच मी त्यांना काही इतिहासकार जोडून देणार होतो, जेणेकरून चित्रपटात एखादी चूक असेल तर ती दुरूस्त करता येईल. पण त्यांनी इतिहासकारांशी भेटण्यात स्वारस्य दाखवले नाही.”

Arjun Kapoor Fan shouting Malaika at Mere Husband Ki Biwi promotion video viral
Video: अर्जुन कपूरला पाहताच चाहत्याने घेतलं मलायकाचं नाव, अभिनेता वैतागून…; नेमकं काय घडलं? जाणून घ्या…
Manoj Jarange, Manoj Jarange movement,
विश्लेषण : मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा प्रभाव ओसरला?…
Madan Manjiri
मदनमंजिरी गाण्यावर चिमुकल्यांची रंगली जुगलबंदी! दोघांनीही केली कमाल, लावणी Video एकदा बघाच
Young man beaten up for watching news against Valmik Karad and Dhananjay Munde
“वाल्मीक कराड, मुंडेंविरोधातील बातम्या का पाहतो” म्हणत तरुणाला मारहाण, बीडच्या धारूरमधील घटना
Priyanka Chopra Dance Video
Video : भावाच्या हळदीत देसी गर्लने शाहरुख खानच्या गाण्यावर लगावले ठुमके; पाहा डान्सचा व्हिडीओ
tharla tar mag sayali and arjun express love for each other
ठरलं तर मग! अर्जुनने पहिल्यांदाच वाजवली बासरी, सायलीने गायलं गाणं! गुडघ्यावर बसून स्वीकारणार लग्नाचं कॉन्ट्रॅक्ट, पाहा प्रोमो
paaru fame Sharayu Sonawane And Shweta Kharat Dance on shahid Kapoor song Saree Ke Fall Sa
Video: पारू आणि अनुष्काचा शाहिद कपूर-सोनाक्षी सिन्हाच्या सुपरहिट गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हिडीओ
Rahul Solapurkar Shivaji Maharaj
“मिठाईचे पेटारे नव्हते, शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले”, मराठी अभिनेत्याच्या वक्तव्याने वादंग

सिनेमॅटिक लिबर्टीची चर्चा व्हावी

“छावा चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळताना आणि नृत्य करताना दिसत आहेत. लेझीम हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. लेझीम खेळणे चूक नाही. पण त्या गाण्यावर नृत्य करणे, हे कितपत योग्य आहे? सिनेमॅटिक लिबर्टीमध्ये हे घ्यायला हवे का? यावर चर्चा करणे आवश्यक आहे”, असे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले. तसेच लेझीम खेळणे चुकीचे नाही, असेही ते म्हणाले.

छत्रपती संभाजीराजे पुढे म्हणाले की, दिग्दर्शक उतेकर यांनी १०० ते २०० कोटी रुपये खर्च करून छत्रपती संभाजी महाराजांवरील हिंदी चित्रपट तयार केला आहे. या माध्यमातून महाराजांचा इतिहास जगभरात जाणार आहे. पण त्यांनी ट्रेलरमध्ये महाराज नृत्य करताना दाखविल्यामुळे ते लोकांना कितपट पटेल, याबाबत शंका वाटते. त्यामुळेच त्यांनी आम्हाला विनंती केल्यास आम्ही राज्यातील महत्त्वाचे इतिहासकार बसून यावर चर्चा केली. तर त्यातून मार्ग निघेल.

चांगले काम करणाऱ्याचे पाय ओढू नयेत

माजी खासदार छत्रपती संभाजीराजे पुढे म्हणाले की, छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी या चित्रपटासाठी अनेक वर्ष मेहनत घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य कसे स्थापन झाले, याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. मी चित्रपटाच्या एका प्रसंगावरून टीका करणार नाही. जर कुणी चांगले काम करत असेल तर त्याचे पाय ओढणे बरोबर नाही. माझी सहकार्य करण्याची भूमिका आहे. त्यांनी लवकरात लवकर इतिहासातील जानकार मंडळींशी भेटून काही दुरुस्ती असतील तर त्या करून घ्याव्यात.

Story img Loader