गोंदियामध्ये एकाच कुटुंबातील चौघांची हत्या

बिसेन कुटुंबातील ८० वर्षीय महिला या घटनेतून बचावल्या.रेवचंद यांच्या आई खेमनबाई डोंगरू बिसेन या त्याच घरातील एका खोलीत झोपल्या होत्या.

गोंदिया : तिरोडा तालुक्यातील चुरडी येथे एकाच कुटुंबातील चौघांच्या निर्घृण हत्येची घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली. हत्याकांडामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, गुन्ह्याात अनेक आरोपींचा सहभाग असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे.

 मृतांमध्ये वाहतूक व्यावसायिक रेवचंद डोंगरू बिसेन (५१), मालता रेवचंद बिसेन (४५), पौर्णिमा रेवचंद बिसेन (२०), तेजस रेवचंद बिसेन (१७) यांचा समावेश आहे. रेवचंद यांच्याकडे ३ मेटॅडोर व एक ट्रॅक्टर आहे. मंगळवारी पहाटे अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून झोपेत असलेल्या बिसेन कुटुंबीयांवर ट्रॅक्टरच्या स्पींडलने वार करून हत्या केली. मालता रेवचंद बिसेन या एका बेडवर रक्ताच्या थारोळ्यात आढळल्या. मुलगी पौर्णिमा बिसेन व मुलगा तेजस  बिसेन हे दुसऱ्या बेडवर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते, तर रेवचंद यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. ही आत्महत्या वाटावी, अशा पद्धतीने आरोपींनी रेवचंद यांचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवला.

बिसेन कुटुंबातील ८० वर्षीय महिला या घटनेतून बचावल्या.रेवचंद यांच्या आई खेमनबाई डोंगरू बिसेन या त्याच घरातील एका खोलीत झोपल्या होत्या. आरोपी मागच्या दारातून आले आणि त्यांनी चौघांची हत्या करूनही खेमनबाई यांना काहीच कळले नाही.

पोलीस  घटनेचा तपास करीत आहेत, पण अद्याप काहीच सुगावा लागला नसल्याचे तपास अधिकारी व तिरोडा ठाण्याचे पोलीस निरीक्षक योगेश पारधी यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Four members of the same family killed in gondia akp

ताज्या बातम्या