कार नदीत उलटून चौघे बुडाले

अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरनजीक धारवाडा येथील बिलदोरी नदीच्या पुलावरून ऑल्टो कार नदीत उलटल्याने एकाच कुटुंबातील चार जणांना जलसमाधी…

अमरावती जिल्ह्यातील कौंडण्यपूरनजीक धारवाडा येथील बिलदोरी नदीच्या पुलावरून ऑल्टो कार नदीत उलटल्याने एकाच कुटुंबातील चार जणांना जलसमाधी मिळाल्याची दुदैवी घटना गुरुवारी उघडकीस आली. संजय गोविंद आजनकर (४६), गजानन गोविंद आजनकर (४०), गायत्री गजानन आजनकर (३५) आणि श्रावणी गजानन आजनकर (७, सर्व रा.यवतमाळ) अशी मृतांची नावे आहेत. आजनकर कुटुंबीय मारुती ऑल्टो कारने वर्धमनेरी येथे नातेवाईकांकडील लग्न समारंभाला उपस्थित राहण्यासाठी बुधवारी यवतमाळ येथून निघाले होते. अंजनसिंगी ते कौंडण्यपूर मार्गावर धारवाडानजीक बिलदोरी नदीवरील पूल पार करताना कार नदीत उलटली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Four people sank