सांगली जिल्ह्याच्या जत तालुक्यातील कुडनूर गाव शनिवारी भीषण हत्याकांडाने हादरले. कुडनूर गावातील एकाच कुटुंबातील चार महिलांची शुक्रवारी रात्री निर्घृणपणे हत्या करण्यात आली. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी तपासाला सुरूवात केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही महिलांवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले आहेत. हा संपूर्ण प्रकार काल मध्यरात्री घडला. दरम्यान, या चौघींची हत्या जमिनीच्या वादातून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कुटुंबातील भारत कुंडलिक इरकर याने जमिनीच्या वादातून आपण चौघींची हत्या केल्याचे कबूल केले. त्याने आज सकाळी पोलीस ठाण्यात येऊन जन्मदात्या आईसह, पत्नी व दोन मुलींची हत्या केल्याचे सांगितले. आई सुशीला कुंडलिक इरकर (वय ६०), पत्नी सिंधुबाई भारत इरकर (वय ४०) आणि मुली रुपाली भारत इरकर (वय १९) व राणी भारत इरकर (वय १६) यांचा मृतांमध्ये समावेश आहे. या घटनेनंतर संपूर्ण कुडनूर गावात एकच खळबळ उडाली आहे.

Pimpri chinchwad, Shocking Murder Unveiled, Drunk female friend Advantage, suicide, murder, suicide turn murder, murder in pimpri, crime in pimpri, police, marathi news, post mortem report
पुणे: मद्यधुंद मैत्रिणीचा गैरफायदा घेऊन ठेवले शारीरिक संबंध; मानलेल्या भावाने केली ‘त्याची’ हत्या
policeman committed suicide by shooting himself in the head
नागपूर : डोक्यात गोळी झाडून पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; कामाचा ताण की…
clemen lobo arrested after 36 years in salim cassetwala murder case
वसईतील प्रसिध्द सलीम कॅसेटवाला हत्या प्रकरण; फरार आरोपी क्लेमेन लोबोला ३६ वर्षांनी अटक
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”