जामवंती नदीत पोहण्यास गेलेल्या चार तरूणांचा बुडून मृत्यू

नदीपात्रातील गाळात फसून बसल्याने वर येता आले नाही

चिखली येथील जामवंती नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेलेल्या चार तरूणांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली. शहरातील सैलानीनगर भागात राहणारे सैय्यद रिझवान सै. फिरोज, शेख साजिद शेख शफीक, वसिम शाह इरफान शाह आणि शेख तौफिक शेख रफिक या चौघांचा मृतांमधे समावेश आहे.

नदीचे खोलीकरण झालेले असुन त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाणी आणि गाळ साचलेला आहे. त्यामुळे पोहण्यासाठी साधारण २० फुटांवरून नदी उडी घेतल्यानंतर हे चौघेजण गाळात फसले व त्यांना वर येता न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला. दुसरीकडे बराच वेळ झाला तरीही घरी परत न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी नदीपात्राकडे धाव घेतली. या ठिकाणी कोणीही आढळून न आल्याने नदीच्या पात्रात शोधाशोध करण्यात आली. दीड ते दोन तासानंतर गाळात फसलेले मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. मुलांचे मृतदेह चिखली ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आले होते. घटनास्थळी आणि चिखली ग्रामीण रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Four young boy drowned in jamvanti river msr

Next Story
नाकर्त्यां लोकप्रतिनिधींमुळे पूरग्रस्त अन्नछत्रात!
ताज्या बातम्या