महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या किटवाड धबधब्यात बुडून बेळगाव शहरातील चार तरुणींचा मृत्यू झाला. किटवाड येथील तरुणांनी तत्परतेने बचाव कार्य केल्याने एका तरुणीला जीवदान मिळाले आहे. या घटनेमुळे किटवाड धबधब्याच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. चंदगड तालुक्यातील किटवाड येथे जलाशयाच्या शेजारी धबधबा आहे. तेथे महाराष्ट्रातील पर्यटकांचा ओढा असतो. तसेच बेळगाव पासून २० किलोमीटर अंतरावर असल्याने सीमाभागातील लोकही येथे नेहमीच हजेरी लावत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंच्या निधनाने राजकीय वर्तुळात शोक; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

असा झाला अपघात

आज सकाळी बेळगाव येथील खंजीर गल्लीतील मुस्लिम समाजातील सुमारे ३० तरुणी किटवाड येथे पर्यटनसाठी आल्या होत्या. धबधब्याचे पाणी प्रवाहित होऊन तयार झालेल्या एका मोठ्या खड्ड्यात त्यांनी स्नान करण्याचे ठरवले होते. पहिली तरुणी खड्ड्यात उतरल्यावर ती बुडू लागल्यावर दुसरीने तिला हात देण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात पाच तरुणी खड्ड्यात बुडाल्या.

हेही वाचा- “गुवाहाटीला कोणाचा बळी द्यायला चालले?” म्हणणाऱ्या अजित पवारांना मुख्यमंत्र्यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “कामाख्या देवी कडक…”

तत्पर बचावकार्य

हा प्रकार पाहून बाकीच्या तरुणींनी आरडाओरडा केल्यानंतर किटवाड गावातील तरुण ,ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. खड्ड्यात उडी मारून बुडालेल्या पाचही तरुणींना वर काढले. बचाव कार्य सुरू असतानाच तरुणींचे नातेवाईक धबधब्याजवळ आले होते. त्यांनी बुडालेल्या तरुणींना बेळगाव येथील रुग्णालयात हलवले. त्यांचे नाव , तपशील समजू शकला नाही. पाच तरुणी बुडाल्याने इतरांनी पुढे जाण्याचा प्रयत्न केला नाही, असे उपस्थित तरुणींनी सांगितले. तर बचाव करण्यात विजय लाड, महेश हेबाळकर, आकाश पाटील या तरुणांनी उल्लेखनीय कामगिरी केली.

हेही वाचा- VIDEO: भर पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्तेंवर शाईफेक का केली? संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते म्हणाले, “भाजपाचं पिल्लू…”

धबधब्याची सुरक्षा धोक्यात

दरम्यान करोना टाळेबंदी नंतर किटवाड धबधबा हे महाराष्ट्र – कर्नाटक सीमा भागातील महत्त्वाचे पर्यटन केंद्र ठरले आहे. मात्र, तेथे सुरक्षेच्या बोजवारा उडाला आहे. सुरक्षेबाबत कोणतेही फलक नसल्याने पर्यटकांवर अनर्थ ओढवल्याच्या घटना आहेत. आजची घटना ही या सर्वावर कडी करणारी ठरली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Four young women in belgaon died after drowning in kitwad waterfall dpj
First published on: 26-11-2022 at 16:18 IST