उस्मानाबाद तालुक्यातील पळसप येथे शिक्षणमहर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान व किसान वाचनालयाच्या वतीने २ फेब्रुवारीला चौथे मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन होणार आहे. संमेलनात परिसंवादासह विविध कार्यक्रम होणार असल्याची माहिती शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी दिली.
शिक्षणमहर्षी वसंतराव काळे साहित्यनगरीत २ फेब्रुवारीला सकाळी काढण्यात येणाऱ्या ग्रंथिदडीचे प्रा. डॉ. राम बोरगावकर यांच्या हस्ते, ग्रंथप्रदर्शनाचे कॅप्टन सुरेश गायकवाड यांच्या हस्ते, तर चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. युवराज भोसले यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी साडेदहा वाजता ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोतापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली व माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन व पुरस्कार वितरण होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, आमदार दिलीप देशमुख व राणाजगजितसिंह पाटील यांची या वेळी उपस्थिती असेल. ‘शेतकरी आत्महत्या – एक समस्या’ यावर प्रा. भास्कर चंदनशिव यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवादात माजी आमदार पाशा पटेल, प्रा. गणेश बेळंबे यांचा सहभाग, तर दुपारी विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली कथाकथन कार्यक्रमात अर्जुन व्हटकर, रामकृष्ण निपाणीकर यांचा सहभाग असेल. प्रा. डॉ. मुकुंद राजपंखे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनात मराठवाडय़ातील नामांकित कवी सहभागी होतील.
संमेलनाध्यक्ष डॉ. कोत्तापल्ले यांच्या अध्यक्षतेखाली व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर, अखिल भारतीय वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बोधलेमहाराज, आमदार अमरसिंह पंडित व सतीश चव्हाण यांच्या उपस्थितीत समारोप होईल. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी रविवारी (दि. १) सकाळी पशुचिकित्सक शिबिर व रात्री किसनराव जगताप महाराज वलांडीकर यांचे कीर्तन होणार आहे.

Venkateswara Mahaswami who has stood on three Lok Sabha seats is in trouble
तीन लोकसभा जागांवर उभे राहिलेले व्यंकटेश्वरा महास्वामी अडचणीत; गुन्हा दाखल होणार
kolhapur, bjp mp milind deora
संजय मंडलिकांचा विजय मोदीजींच्या बलशाली भारतासाठी आवश्यक – खासदार मिलिंद देवरा
India to get above normal rain
दिलासा; यंदा उत्तम पावसाचा अंदाज
Uday Samant Nagpur
“रत्नागिरी – सिंधुदुर्गवर आमचाच हक्क” – उदय सामंत