कोविड काळात ऑनलाईन सायबर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर ‘प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना’ नावाखाली बनावट ब्लॉगस्पॉट वेबपेज तयार करून सर्वसामान्यांची फसवणूक करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चंद्रपूर येथील रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, ऑनलाईन फसवणूकीपासून सावध राहण्याचे आवाहन जिल्हा पोलीस दलाने केले आहे.

Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
Narendra Modi, Pune, Road Show,
पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर सभेबरोबरच ‘रोड शो’
On the occasion of Prime Minister Narendra Modi visit to Kanhan Nagpur police force on high alert mode Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…
Sunita Kejriwal
‘आप’च्या ५५ आमदारांनी घेतली सुनीता केजरीवालांची भेट; मुख्यमंत्रीपदाबाबत दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले…

करोना संक्रमण काळात सर्वत्र टाळेबंदी असल्याने बाजारपेठ बंद आहे. रूग्णालय, औषधविक्री दुकान तथा किराणा व भाजीपाला या शिवास संपूर्ण व्यापार ठप्प आहे. त्यामुळे या काळात बेरोजगारांकडून सायबर फसवणूक केल्या जात असल्याची असंख्य प्रकरणे समोर येत आहेत. ऑलाईन बँकींगमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत आहे. त्या पाठोपाठ आता काही सायबर भामट्यांनी प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजनेच्या नावाखाली बेरोजगारांची फसवणूक सुरू केली आहे. समाज माध्यमामध्ये बनावट ब्लॉगस्पॉट वेबपेज तयार करून फसवणूकीचा प्रयत्न करून सायबर गुन्हेगारांकडून सर्व सामान्य लोकांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे.

“प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना – २०२१” या मथळ्याखाली ब्लॉगस्पॉट वेबपेज तयार करून त्यात बेरोजगार लोकांना खोटी लिंक पाठवून, त्यामध्ये मोफत नोंदणी करण्यासाठी फार्म भरण्याचा आग्रह करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या छायाचित्राचा वापर केला गेला असल्याने ही खोटी लिंकही खरी वाटत आहे. त्यामुळे अनेक तरूण याला बळी पडत आहे. ही बाब चंद्रपूर सायबर सेलच्या निदर्शनास येताच येथील रामनगर पोलीस ठाण्यात अज्ञाता विरूध्द माहिती तंत्रज्ञान कायदा अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातील नागरिकांनी अशा थापांना बळी पडू नये, नागरिकांनी अशा भुलथापांना बळी न पडता कोणत्याही प्रकारचे नोंदणी किंवा व्यक्तीगत माहिती शेअर न करता सजग राहून सायबर गुन्हेगारीस प्रतिबंध करून मदतीसाठी नजिकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांनी केले आहे.