मोठी बातमी! घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली होणार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा निर्णय ; आरोग्याच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना

(प्रातिनिधिक छायाचित्र)

नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजेच ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या करोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल.

तसेच, धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धार्मिक स्थळांच्या व्यवस्थापन समितीची यामध्ये मोठी जबाबदारी आहे हे विसरू नये.

तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरं खुली करण्यााचा आता घेतलेला निर्णय म्हणजे, एकप्रकारे उशिरा सुचलेले शहाणपण..आहे. असा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

राज्यातील मंदिर उघडण्यासाठी भाजपाकडून ठाकरे सरकारविरोधात राज्यभरात जोरदार आंदोलन करण्यात आलं होतं. शिवाय, वेळोवेळी या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांवर टीका देखील केली जात होती. अखेर मंदिर खुली करण्याचा मुहूर्त आता निघाला असल्याचे दिसत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: From the first day of navratri multi religious places of worship will be open in the state msr

ताज्या बातम्या
फोटो गॅलरी