scorecardresearch

शहीद रामेश्वर काकडे यांच्यावर अंत्यसंस्कार; छत्तीसगडमध्ये नक्षलवादी हल्ल्यात वीरमरण

छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलेल्या रामेश्वर वैजिनाथ काकडे या निमलष्करी जवानाच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी गौडगाव येथे (जि. सोलापूर ता. बार्शी) शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले.

सोलापूर : छत्तीसगड येथे नक्षलवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलेल्या रामेश्वर वैजिनाथ काकडे या निमलष्करी जवानाच्या पार्थिवावर त्यांच्या मूळ गावी गौडगाव येथे (जि. सोलापूर ता. बार्शी) शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. शहीद काकडे हे गरीब कुटुंबातील असून गेल्याच वर्षी त्यांचा विवाह झाला होता. त्यांना तीन महिन्यांचा मुलगा आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलीसह वृध्द आई-वडील आणि दोन बहिणी आहेत.

छत्तीसगड येथे नक्षलग्रस्त भागात काकडे हे सेवा बजावत असताना नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. त्यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी गौडगाव येथे आणण्यात आले होते. तेथेच त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शोकाकूल झालेल्या संपूर्ण गौडगावात चूल पेटली नव्हती. काकडे हे २०१२ साली जम्मू काश्मीरमध्ये लष्करात रुजू झाले होते. त्यानंतर त्यांनी विविध राज्यांच्या सीमांवर सेवा बजावली होती. अलीकडे त्यांची सेवा छत्तीसगडमध्ये नक्षलवादी भागात सुरू होती.

दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी रात्री गौडगाव येथे शहीद काकडे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. शहीद काकडे यांच्या प्रतिमेला त्यांनी अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, सरपंच स्वाती पैकेकर, तहसीलदार सुनील शेरखाने, शहीद जवान रामेश्वर काकडे यांचे वडील वैजिनाथ काकडे, आई सुनंदा काकडे, हुतात्मापत्नी रोहिणी यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Funeral rameshwar kakade heroic death naxal attack in chhattisgarh ysh

ताज्या बातम्या