scorecardresearch

गडचिरोली : नक्षल्यानी पाच वाहने जाळली, मजुरांना बेदम मारहाण

या घटनेत जखमी मजुरांना भामरागड सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Naxal aatack
एक जेसीबी, एक पोकलैंड, दोन ट्रॅक्टर, दोन आणि दुचाकी जाळण्यात आल्या.

गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा नक्षली सक्रिय झाले आहेत. नक्षल्यानी ५ वाहनांना आग लावून ३ मजुरांना बेदम मारहाण केली. ही वाहने आणि मजूर रस्ते निर्मितीच्या कामावर होते.

भामरागड तालुक्यातील विसामुंडी येथे बुधवारी रात्री २५ च्या संख्येतील नक्षली अचानक रस्ते कामाच्या ठिकाणी आले आणि त्यांनी एक जेसीबी, एक पोकलैंड, दोन ट्रॅक्टर, दोन आणि दुचाकी जाळल्या. या घटनेत जखमी मजुरांना भामरागड सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gadchiroli naxals set fire to five vehicles beat workers msr

ताज्या बातम्या