scorecardresearch

Premium

“गांधींचे विचार संपले, या देशात आता नथुराम…”, गुणरत्न सदावर्ते बरळले; म्हणाले, “भारताचे तुकडे…”

एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची आज सर्वसाधारण सभा होती. एसटी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या यंदाच्या अहवालावर नथुराम गोडसेचा फोटो छापला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये राडा झाला.

Gunratna sadavarte
काय म्हणाले गुणरत्न सदावर्ते? (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची सर्वसाधारण सभा आज यवतमाळमध्ये पार पडली. या सभेत तुफान राडा झाल्याचं समोर आलं आहे. एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अहवालावर नथुराम गोडसेचा फोटो छापल्याप्रकरणी हा राडा झाला. हा राडा एसटी कर्मचाऱ्यांच्या कष्टकरी जनसंघाचे अध्यक्ष आणि सनद रद्द झालेले गुणरत्न सदावर्ते यांनी हॉटेलमध्ये बसून व्हिडीओ कॉलवरून पाहिला असल्याचा दावा केला जातोय. दरम्यान, यावरून गुणरत्न सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, “शरद पवारांचे बगलबच्चे तांदळा एवढ्या खड्याइतके होते. गोंधळ वगैरे काही करू शकले नाहीत. तोंडातून शब्दही बाहेर पडले नाहीत. अत्यंत घाणेरडी कृती आहे. संदीप शिंदेंना (महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष) धडा शिकवण्याची गरज आहे. ज्या अहवालावर प्रभू राम चंद्रांचा फोटो, हिंदू राष्ट्रभारत लिहिलेला आहे, त्या अहवालावर हात लावण्याचा प्रयत्न केला आणि तिथून झोडपून बाहेर काढलेलं आहे.”

narendra modi Supriya sule
“सर्वात जास्त पैसेवाले लोकही या देशात ४० टक्के कर भरत नाहीत, मात्र…”, सुप्रिया सुळेंचा सरकारवर हल्लाबोल
Uddhav thackeray on nanded case
नांदेड मृत्यूप्रकरणी उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “खेकड्यांच्या हातात…”
union minister kumar mishra in satara for bjp contact campaign remark on ajit pawar
Video : अजित पवार महायुतीमध्ये आल्यामुळे भाजपला काही फरक पडत नाही-अजय कुमार मिश्रा
K Abhijit Right To Love
प्रेमविवाहासाठी घरच्यांच्या परवानगीची सक्ती करणाऱ्या ग्रामपंचायतीच्या अडचणीत वाढ, ‘राईट टू लव्ह’कडून नोटीस, म्हणाले…

“शरद पवारांच्या विचारांना जसं झोडपून बाहेर काढलं, तसं त्यांच्या बगलबचच्च्यांनाही झोडपून बाहेर काढलं. नथूराम गोडसेंची अखंड भारताची भूमिका आजही हिंदूस्थानी काळजात ठेवून आहे. कोणालाही भारताचे तुकडे पसंत नाहीत. गांधींजींचा विचार आता काहीच शिल्लक राहिलेला नाही. अखंड भारताचा विचार शिल्लक आहे. पाकिस्तान दिल्याचा विषय शिल्लक नाही. नथूरामांचे विचार काँग्रेसी विचार संपवू शकत नाहीत, थातूर मातूर तुटक्या मुटक्या विचारांचे अजिबात संपवू शकत नाहीत. शरद पवारांचा विचार नथूराम गोडसेच्या पायाच्या धुळीइतकाही नाही, असं माझं स्पष्ट मत आहे”, असं सदावर्ते म्हणाले.

नेमकं काय झालं?

एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेची आज सर्वसाधारण सभा होती. एसटी को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या यंदाच्या अहवालावर नथुराम गोडसेचा फोटो छापला आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये राडा झाला. गुणरत्न यांनी याआधीही नथुराम गोडसेचा फोटो आपल्या बैठकांमध्ये वापरला होता. त्यामुळे आजच्या सभेत महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने निषेध नोंदवत राडा केला.

“नथुराम गोडसेचं उदात्तीकरण महाराष्ट्रात किंबहुना देशात खपवून घेतलं जाणार नाही. नथुराम गोडसेचा फोटो छापल्यामुळे एसटी स्टेट ट्रान्सपोर्ट संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यामुळे आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला गुणरत्न सदावर्ते यांना येता देखील आलं नाही. आजच्या सभेवेळी त्यांच्या खुर्च्या देखील रिकाम्या होत्या”, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी एबीपी माझाला दिली.

“आजच्या घडीला एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची असणारी बँक सदावर्ते यांच्यामुळे अडचणीत आली आहे. बँकेच्या कर्मचाऱ्यांना संप सुरू केला आहे. एखादा कर्मचारी आजारी असेल तरी कुठल्याही प्रकारची त्याला वैद्यकीय मदत मिळण्याइतपत देखील पैसे मिळत नाहीत. एक प्रकारे बँक अडचणीत आणण्यामध्ये सदावर्ते यांचा मोठा हात आहे:, असा आरोपही शिंदे यांनी केला.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Gandhis thoughts are over now nathuram in this country gunaratna sadavarte gushed said pieces of india sgk

First published on: 28-09-2023 at 21:07 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×