लोकसत्ता प्रतिनिधी

सोलापूर : यंदा गणेशोत्सवाचे औचित्य साधून महायुती सरकारने राज्यातील रेशनकार्डधारकांना अवघ्या शंभर रुपयांत आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु इकडे सोलापूर जिल्ह्यात गणेशोत्सवाची सांगता होत असतानाही आनंदाचा शिधा पोहोचला नाही. केवळ तीन तालुक्यांमध्ये त्याचा लाभ मिळाला असून उर्वरित आठ तालुके अद्याप आनंदाच्या शिधापासून वंचितच राहिले आहेत. त्यामुळे बहुसंख्य रेशनकार्डधारकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

pune porsche Accident (3)
Maharashtra News Live : पुणे पोर्श अपघात : आरोपीला निबंध लिहायला सांगणाऱ्या बाल न्याय मंडळाचे दोन अधिकारी बडतर्फ
Dasara Melava Beed News
Dasara Melava Beed : पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला…
Anti-terror squads big operation in Chiplun Sawarde Six people were taken into custody
चिपळूण सावर्डेत दहशत विरोधी पथकाची मोठी कारवाई; सहा जणांना घेतले ताब्यात
Raj Thackeray On Ratan Tata
Ratan Tata : “आज मी एक ज्येष्ठ मित्र गमावला, याचं दुःख…”, राज ठाकरेंकडून रतन टाटांच्या आठवणींना उजाळा
Petrol Diesel Rate Today in Marathi
Petrol Diesel Price Today : ठाण्यात किती रुपयांनी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव? महाराष्ट्रातील कोणत्या शहरांत कमी झाला इंधनाचा दर? जाणून घ्या
Tata Funeral Updates| Maharashtra Declares Day of Mourning Today
Ratan Tata Funeral : रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार, राज्य सरकारकडून एक दिवसाचा दुखवटा जाहीर
barshi mla Rajendra raut
बार्शीत आमदार राजेंद्र राऊतांची भाजपकडून लढण्याची घोषणा
Non creamy layer income limit
‘नॉन क्रीमीलेअर’ उत्पन्न मर्यादा १५ लाख? केंद्राला शिफारस ; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज प्रस्ताव
pm narendra modi
“हिंदूंमध्ये फूट, हे काँग्रेसचे धोरण”, पंतप्रधानांचे टीकास्त्र; निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील अनेक प्रकल्पांचे लोकार्पण

आनंदाच्या शिध्यामध्ये प्रत्येकी एक किलो रवा, साखर, चणाडाळ आणि सोयाबीन तेलाचा समावेश आहे. अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेतील रेशनकार्डधारक त्याचे लाभधारक आहेत. महायुती शासनाने यापूर्वी दिवाळी व अन्य महत्त्वाच्या सण उत्सवाचे औचित्य साधून संबंधित लाभार्थी रेशन कार्डधारकांसाठी आनंदाचा शिधा यशस्वीपणे वाटप केला होता. त्याबद्दल रेशन कार्डधारकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले होते. यंदाही गणेशोत्सवाचे निमित्त साधून शासनाने आनंदाचा शिधा वाटप करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सोलापूर जिल्ह्यात उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट या तीनच तालुक्यांमध्ये आनंदाचा शिधा पोहोचला आहे. उर्वरीत मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, बार्शी, मंगळवेढा, सांगोला आणि माळशिरस हे आठ तालुके आनंदाच्या शिधापासून अद्यापि वंचित राहिले आहेत.

आणखी वाचा-साताऱ्यात विसर्जन मिरवणूक तयारीची लगबग

उत्तर सोलापूर तालुक्यात सोलापूर शहराचा समावेश असून शहरात एकूण ३१४ रेशन धान्य दुकाने आहेत. त्यापैकी आतापर्यंत केवळ शंभर रेशन धान्य दुकानातच आनंदाचा शिधा उपलब्ध झाला आहे. त्यात सुद्धा साखर, रवा, चणाडाळ आणि सोयाबीन तेल संपूर्णपणे मिळाले नाही. काही दुकानात साखर व रवा मिळतो तर काही दुकानात चणाडाळ किंवा अन्य शिधा मिळतो. अन्नपुरवठा विभागाच्या एकूण चार परिमंडळ विभागांपैकी ब आणि क या दोन्ही परिमंडळ विभागातील रेशन दुकानांमध्ये आनंदाचा शिधा पोहोचला नाही. एका रेशन दुकानात आनंदाचा शिधा मिळतो तर दुसऱ्या दुकानात मिळत नाही, अशी परिस्थिती असल्यामुळे संबंधित लाभार्थी रेशन कार्डधारक आणि रेशन धान्य दुकानदार यांच्यात शाब्दिक खटके उडत असल्याचे चित्र पाहायला मिळते.

सोलापूर शहरात आनंदाचा शिधा मिळण्यासाठी पात्र असलेल्या अंत्योदय योजनेतील रेशनकार्डधारक ६०८९ तर अन्नसुरक्षा योजनेतील रेशनकार्डधारक एक लाख १३ हजार ७०० एवढे आहेत. जिल्हा ग्रामीणमध्ये अंत्योदय योजनेतील रेशनकार्डधारकांची संख्या ५९ हजार २३३ आणि अन्नसुरक्षा योजनेतील रेशनकार्डधारकांची संख्या तीन लाख ५० हजार ४५४ एवढी आहे.

आणखी वाचा-विसर्जन मिरवणुकीसाठी सांगली, मिरज सज्ज

आनंदाचा शिधा लवकरच

गणेशोत्सवानिमित्त शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यात लाभार्थी रेशन कार्डधारकांसाठी मिळणारा आनंदाचा शिधा पोहोचण्यास विलंब झाला आहे. आतापर्यंत तीन तालुक्यांमध्ये आनंदाचा शिधा वाटप झाला असून अन्य आठ तालुक्यांमध्ये आनंदाचा शिधा वाटप होणे बाकी आहे. साखर आणि रवा उपलब्ध झाला आहे. उर्वरीत जिन्नस मिळण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. आम्ही प्रतिक्षेत आहोत. लवकरच आनंदाचा शिधा मिळेल आणि लाभार्थी रेशनकार्डधारकांना त्याचे वाटप होईल. -संतोष सरडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर