नागपूरमधील रेड लाइट एरियात जमावबंदीचे आदेश; शेकडो पोलिस तैनात

काही दलाल अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती पोलिसांनी मिळालीय.

Nagpur Police
बुधवारी रात्री केली कारवाई

उपराजधानीतील देहव्यापारासाठी (कु)प्रसिद्ध असणाऱ्या गंगा जमुनात बुधवारी रात्री पोलिसांनी संचारबंदी (सील) लागू केली असून प्रचंड पोलिस बंदोबस्तात पोलिसांनी या परिसराची झाडाझडती सुरू केली आहे.

गंगा जमुनात करोना नियमांचे सर्रास उल्लंघन होत आहे. या भागात गुन्हेगारांचा वावर असून, काही दलाल अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करवून घेत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. याशिवाय परिसरातील नगरसेवक व प्रतिष्ठीत नागरिकांनीही गंगा जमनामुळे होणाऱ्या त्रासाबाबत पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली. याची दखल घेत पोलिस आयुक्तांनी बुधवारी रात्री गंगा जमुना सिल करून या भागात संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. याबाबतची अधिसूचनाही काढण्यात आली. यासह लकडगंज पोलिसांच्या पाच अधिकारी व १०० पोलिस कर्मचाऱ्यांच्या प्रचंड ताफा या भागात तैनात करण्यात आला आहे. बुधवारी रात्री पोलिसांनी गंगा जमुना परिसराची झाडाझडती सुरू केली.

दारू दुकानांचे परवाने रद्द करणार

गंगा जमुना परिसरात देशी दारू, बीअर शॉपी, वाइन शॉपसह एक बीअर शॉपही आहे. या सर्वांचे परवाने रद्द करण्याचे पत्र आयुक्तांनी उत्पादन शुल्क विभागाला पाठविले आहेत. आता उत्पादन शुल्क विभाग आयुक्तांच्या पत्रावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. तसेच परिसरातील घरांमध्ये देहव्यापारासाठी अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. हे बांधकाम तोडण्याची विनंती अमितेश कुमार यांनी महापौर दयाशंकर तिवारी यांना केली असल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ganga jamuna red light area sealed by nagpur police scsg