Anant Chaturdashi 2022 Live Updates: Mumbai pune thane solapur kolhapur sangli vidarbha marathwada ganpati visarjan ganesh idols miravnuk news, photos, videos | Maharashtra news live | Loksatta

Ganapati Visarjan 2022 : आज निरोपाचा दिवस, महाराष्ट्रात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह!

Maharashtra Anant Chaturdashi 2022 Updates : दहा दिवस भक्तीभावाने बाप्पाचा पाहुणचार केल्यानंतर आज राज्यभर गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Anant Chaturdashi 2022 Live Updates | Mumbai- maharashtra ganesh visarjan 2022 live updates | Ganapati Visarjan 2022 Live
गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा राज्यभर उत्साह!

Mumbai- Maharashtra Ganesh Visarjan 2022 Updates, 09 September 2022 : जवळपास दोन वर्षांनंतर यंदा निर्बंधमुक्त वातावरणात महाराष्ट्रासह देशभरात आणि विदेशातही बाप्पाचं धुमधडाक्यात आगमन झालं. गेल्या दहा दिवसांपासून सर्वच ठिकाणी गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत होता. आज शेवटच्या दिवशी बाप्पाला तितक्याच उत्साहात निरोप देण्यासाठी भक्तगण सज्ज झाले आहेत. मुंबई-पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळत आहे.

Live Updates

Maharashtra Ganpati Visarjan 2022 : गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा राज्यभर उत्साह!

22:32 (IST) 9 Sep 2022
विसर्जन घाटावर ११ भावीकांना विजेचा झटका; पनवेलमधील मोठी दुर्घटना

पनवेल पालिका क्षेत्रात कोळीवाडा विसर्जन घाटावर सायंकाळी साडेसात वाजता जनरेटरसाठी जोडणी घेतलेली विजेची तार गणेशभावीकांच्या अंगावर पडल्याने तब्बल ११ गणेशभक्तांना विजेचा शाॅक (झटका) लागल्याने एकच खळबळ माजली. डोक्यावर पाऊस पडत असताना लाडक्या गणेशबाप्पांना निरोप देत असताना ही घटना घडली.

सविस्तर वाचा

21:31 (IST) 9 Sep 2022
पुणे : पारंपरिक पद्धतीने आणि भक्तीभावाने मानाच्या बाप्पांना निरोप

तब्बल दहा तास चाललेल्या मानाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीची शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास सांगता झाली. सनई चौघड्यांचे वादन, बॅण्ड पथके आणि ढोल ताशांचा गजर तसेच रांगोळीच्या आणि विविधरंगी फुलांच्या पायघड्या अशा पारंपारिक आणि भक्तीमय वातावरणात मानाच्या गणपतींना निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणांनी विसर्जन मार्ग  दुमदुमून गेला.

सविस्तर वाचा

21:14 (IST) 9 Sep 2022
नवी मुंबईत भर पावसात विसर्जनाचा उत्साह कायम, संध्याकाळी ७ .३० पर्यंत २२ मिमी पावसाची नोंद

नवी मुंबई शहरात १० दिवसांच्या बाप्पांना निरोप देण्यात येत असून शहरात २७५ सार्वजनिक गणेश मंडळांचा व हजारो घरगुती गणरायांचा विसर्जन सोहळा दुपारी ४ वाजल्यापासून सुरु झाला. परंतु ४.३० वाजल्यापासूनच शहरात जोरदार पावसाने सुरवात केली. त्यामुळे विसर्जन मिवणुकीदरम्यान भक्तांना अनेक अडचणी आल्या. परंतु भक्तांचा जोश कायम होता.

सविस्तर वाचा

20:30 (IST) 9 Sep 2022
पुणे : आठ तासात मानाच्या चार गणपतींचे विसर्जन

दुपारी बारा वाजता सुरू झालेल्या पुण्याच्या दिमाखदार गणेश विसर्जन मिरवणुकीतील मानाच्या चार गणपतींच्या विसर्जनालाच आठ तास लागले. त्यामुळे लक्ष्मी रस्त्यावरील मिरवणुकीत सहभागी होण्यास उत्सुक असलेल्या अनेक मंडळांना दीर्घ काळ वाट पाहावा लागत आहे.

सविस्तर वाचा

19:47 (IST) 9 Sep 2022
उरण मध्ये विसर्जनाला उत्साहात सुरुवात; पावसाने विश्रांती घेतल्याने गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित

सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास पावसाने हजेरी लावल्याने विसर्जनासाठी आलेल्या भक्तांची तारांबळ उडाली होती मात्र तासाभराने पावसाने उसंत घेतल्या नंतर पुन्हा एकदा विसर्जनाला सुरुवात झाली असून भक्तांचा आनंद द्विगुणीत झाला आहे. त्यामुळे टाळ, मृदुंग व भजनाच्या तालावर व ढोल ताशांच्या गजरात, गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणा देत गणेशभक्तानी मिरवणुका काढून विसर्जनाच्या ठिकाणी येत होते.

सविस्तर वाचा

18:56 (IST) 9 Sep 2022
गणेशभक्तांचा टिळक रस्त्यावरील मिरवणुकीतही उत्साह

लक्ष्मी रस्त्यावरील मुख्य मिरवणुकी बरोबरच टिळक रस्त्यावरील मिरवणुकीतही उत्साह होता. गणेश मंडळांच्या सजावटी भक्तांचे लक्ष वेधून घेत होत्या. मात्र या रस्त्यावर तुलनेने गर्दी कमी दिसत होती. मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या उत्साहाला मात्र तेवढेच उधाण आले होते.

सविस्तर वाचा

18:22 (IST) 9 Sep 2022
उत्सवी उत्साहातही रुग्णवाहिकांना मार्ग देण्यासाठी पोलिस आणि नागरिक तत्पर

अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने सार्वजनिक गणपतींच्या विसर्जन मिरवणुकांचा आनंद लुटण्यासाठी टिळक चौक नागरिकांनी फुलून केला असतानाही रुग्णवाहिकांना मार्ग काढून देण्याची तत्परता नागरिकांकडून दाखवण्यात आली. त्यांना पोलिसांचे सहकार्यही मिळाले. पावणेसहाच्या दरम्यान, टिळक चौकात मानाचा तिसरा गुरुजी तालीम सार्वजनिक गणपती दाखल होण्यापूर्वी रुग्णवाहिका रुग्णाला घेऊन टिळक चौकात दाखल झाली.

सविस्तर वाचा

18:20 (IST) 9 Sep 2022
विसर्जन मार्गावर ध्वनिवर्धक, ढोल ताशांचा दणदणाट; आवाजाची तीव्रता मर्यादेबाहेर

विसर्जन मार्गावरील दणदणाटाने आवाजाची मर्यादा ओलांडली. ध्वनिवर्धक, ढोल ताशांच्या आवाजामुळे विसर्जन मार्ग परिसरातून चालणे देखील अवघड झाले होते. आवाजाने थरकाप उडत होता. दणदणाटामुळे रहिवाशांसह भाविकांनाही त्रासाला सामोरे जावे लागले.

सविस्तर वाचा

18:17 (IST) 9 Sep 2022
पुणे : अशोक सराफ यांच्या कारकिर्दीला गणपती विसर्जन रथाद्वारे सलाम

महाराष्ट्राचे लाडके ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या अभिनय कारकिर्दीला सलाम म्हणून पत्र्या मारुती गणपती मंडळाने विशेष विसर्जन रथ तयार केला आहे. ‘अशोक मामांचा हास्यरथ’ असे नाव असलेला हा रथ अशोक सराफ यांच्या गाजलेल्या विनोदी भूमिका आणि संवादांच्या कटआऊटने सजवण्यात आला आहे. 

सविस्तर वाचा

18:01 (IST) 9 Sep 2022
गणेशभक्तांचे आकर्षण असणाऱ्या पुण्याच्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; मानाच्या गणपती विसर्जनाला विलंब

देश विदेशातील गणेशभक्तांचे प्रमुख आकर्षण असणाऱ्या वैभवशाली विसर्जन मिरवणुकीला शुक्रवारी दिमाखात प्रारंभ झाला. दोन वर्षांच्या कालावधीनंतर निर्बंधमुक्त उत्सव साजरा होत असल्याने गणेशभक्तांच्या आनंदाला उधाण आल्याचे चित्र विसर्जन मिरवणुकीत दिसून आले. मात्र  शहरातील मानाच्या गणपतींची विसर्जन मिरवणुक लांबल्याचेही स्पष्ट झाले.

सविस्तर वाचा

17:58 (IST) 9 Sep 2022
घरगुती गणपतींचे विसर्जन दादर, माहीम चौपाटीवर अधिक; गणेशभक्तांची विसर्जनासाठी गर्दी कायम

लालबाग, गिरगांव परिसरात सकाळपासून गणपती विसर्जनाचा सुरू झालेला जल्लोष आणि गिरगाव चौपाटीवर असलेली गर्दी पाहता तुलनेने दादर, माहीम परिसरात मात्र दुपारपर्यंत विसर्जन शांततेत सुरू होते. दुपारी तीन वाजेपर्यंत घरगुती गणपतीचे विसर्जन अधिक झाले.

सविस्तर वाचा

17:10 (IST) 9 Sep 2022
मुंबई : गणेश विसर्जनातील बॅरिगेट्सचे अडथळे दूर ; महत्त्वाच्या ठिकाणचे बॅरिगेट्स एमएमआरडीएने हटविले

गणेश मूर्तींच्या विसर्जन मिरवणुकीदरम्यान मेट्रो किंवा इतर प्रकल्पाच्या कामांसाठी रस्त्यावर लावण्यात आलेल्या बॅरिगेट्समुळे कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाच्या ठिकाणचे बॅरिगेट्स तात्पुरते हटवले आहेत.

सविस्तर वाचा

16:20 (IST) 9 Sep 2022
मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपती मिरवणुकीत नीलम पाटील यांनी वेधलं लक्ष

पुणेकर भक्तीभावाने लाडक्या गणरायाला निरोप देत आहेत. पुण्यातील मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत महिला वाहतूक पोलीस नीलम पाटील यांनी मर्दानी खेळ दाखवत लक्ष वेधून घेतलं.
पाहा व्हिडीओ

16:19 (IST) 9 Sep 2022
पुणेकरांचा बाप्पाला निरोप

१० दिवस बाप्पांची मनोभावे पूजा केल्यानंतर आज त्यांना निरोप देण्यात येतोय. पुण्यात घरगुती बाप्पांच्या विसर्जनासाठी मिरवणूक काढण्यात आली.
पाहा व्हिडीओ

14:56 (IST) 9 Sep 2022
मुंबई : गणेश गजराने मुंबई दुमदुमली

दोन वर्षांनी निर्बंधमुक्त वातावरणात गणेशोत्सव साजरा झाल्यानंतर शुक्रवारी अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपतीला निरोप देण्यासाठी विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत. मुंबईतील ठिकठिकाणच्या मानाच्या गणपतींचे विसर्जन सकाळपासून सुरू झाले आणि अवघी मुंबापुरी गणेशाच्या गजराने दुमदुमली आहे.

सविस्तर वाचा

14:28 (IST) 9 Sep 2022
चंद्रपूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत ‘पन्नास खोके, एकदम ओके’ टी-शर्ट ठरतेय लक्षवेधी

राज्यातील सत्तांतरानंतर ‘पन्नास खोके, एकदम ओके’ ही घोषणा राजकीय वर्तुळासोबतच समाजात व समाज माध्यमांत चर्चेत आहे. आता तर सार्वजनिक उत्सवातदेखील या घोषणेचा वापर होत आहे. गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी ‘पन्नास खोके, एकदम ओके’, असे लिहिलेल्या टी-शर्ट आल्या आहेत. या ‘टी-शर्ट’ राजकीय वर्तुळात सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत.

सविस्तर वाचा

14:21 (IST) 9 Sep 2022
वाजत गाजत ‘नागपूरच्या राजा’ला निरोप

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… असा जयघोष करत ढोल ताशांच्या गजरात दहा दिवसांच्या मुक्कामानंतर नागपुरात गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. सकाळी तुळशीबाग येथील नागपुरच्या राजाची विसर्जन मिरवणूक निकाली व कोराडी येथे मूर्ती विसर्जित करण्यात आली.

सविस्तर वाचा

12:33 (IST) 9 Sep 2022
एकनाथ शिंदे यांची पुण्यातील गणेशोत्सव संपर्क मोहीम फलदायी होईल का ?

पावसात भिजत, कार्यकर्त्यांची संवाद साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नियोजित नऊ मंडळांऐवजी एकूण २५ मंडळांना भेटी दिल्या. शहरातील प्रमुख सार्वजनिक मंडळांचे सामाजिक आणि राजकीय महत्व लक्षात घेत संपर्क मोहीम एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांसाठी फलदायी ठरणार का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

सविस्तर वाचा…

12:11 (IST) 9 Sep 2022
पुणे : आदित्य ठाकरे गणपती दर्शनासाठी पुण्यात

राज्यातील सध्याचे राजकारण खूप वाईट आहे. राज्यासाठी विकासासाठी असे राजकारण नक्कीच चांगले नाही. लोकांना राजकारणाचा कंटाळा येईल इतके आजचे राजकारण वाईट होत आहे, अशी टीका शिवेसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी येथे केली.

सविस्तर वाचा

11:49 (IST) 9 Sep 2022
Aditya Thackeray Chandrakant Patil: आदित्य ठाकरे गर्दीतून मार्ग काढत आले, चंद्रकांत पाटील म्हणाले “दर्शन घेऊन ये”

करोनानंतर दोन वर्षांनी निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यात आला असून, आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनी ठिकठिकाणी गर्दी केली आहे. राज्यभरात अनंत चतुर्दशीचा उत्साह असून गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये फक्त सर्वसामान्यच नाही, तर राजकीय नेतेही सहभागी होत आहेत. एकीकडे राज्यात संघर्ष सुरु असताना मिरवणुकीत मात्र नेते मतभेद विसरुन एकत्र येताना दिसत आहे. असंच काहीसं चित्र पुण्यात आदित्य ठाकरे आणि चंद्रकांत पाटील आमने-सामने आल्यानंतर पहायला मिळालं.

सविस्तर बातमी

10:33 (IST) 9 Sep 2022
मुंबई-पुण्यात गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा उत्साह

मुंबईचा राजा मिरवणुकीला सुरुवात, लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीची तयारी सुरू!

10:30 (IST) 9 Sep 2022
गणपती बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्दशीलाच का केले जाते?

गणपती बाप्पाचे विसर्जन अनंत चतुर्दशीलाच का केले जाते हे बऱ्याच जणांना माहित नसेल. यामागचे कारण आणि या दिवसाचे महत्त्व जाणून घेऊया.

वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा राज्यभर उत्साह!

Maharashtra Ganpati Visarjan 2022 Live : गणरायाच्या विसर्जन मिरवणुकांचा राज्यभर उत्साह!

First published on: 09-09-2022 at 10:29 IST
Next Story
“एकवेळ सूर्य पश्चिमेकडे उगवेल, पण बारामतीकर पवारांना सोडणार नाही”, जयंत पाटलांच्या वक्तव्यावर शहाजीबापूंचं प्रत्युत्तर, म्हणाले…