Gautami Patil : नृत्यांगना गौतमी पाटील सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. अमरावतीत गौतमी पाटीलचा कार्यक्रम होणार आहे. या अनुषंगाने ती अमरावतीत पोहचली आहे. यावेळी तिने राजकारणात जाणार का? या प्रश्नावर उत्तर दिलं. अल्पावधीत भरपूर प्रसिद्धी मिळालेली ही नृत्यांगना आहे. गौतमी पाटीलने आत्तापर्यंत विविध शहरांमध्ये कार्यक्रम केले आहेत. सबसे कातील गौतमी पाटील असंही तिला म्हटलं जातं. आता याच गौतमीने राजकारणात जाणार का? या प्रश्नावर उत्तर दिलं आहे.

गौतमी पाटील आणि गर्दी समीकरण ठरलेलं

गौतमी पाटील ( Gautami Patil ) आणि गर्दी हे समीकरण कायमच पाहण्यास मिळतं. तसंच तिच्या कार्यक्रमांची चर्चाही अनेकदा रंगते. कारण त्यात राडाही होतो, कधी खुर्च्याही तुटतात, कधी वादावादीही होते. पश्चिम महाराष्ट्रात गौतमीचे कार्यक्रम जास्त प्रमाणावर होतात. दही हंडीच्या दिवशीही गौतमीचे लावणीचे कार्यक्रम सादर होतात. आता अमरावतीत गौतमी ( Gautami Patil ) पहिल्यांदाच आली आहे. गौतमी पाटीलची ( Gautami Patil ) प्रसिद्धी आणि तिच्या कार्यक्रमांना येणाऱ्या लोकांची गर्दी यामुळे दोन प्रश्न सतत उपस्थित होतात. एक प्रश्न असतो गौतमी पाटीलच्या लग्नाचा आणि दुसरा असतो ती राजकारणात कधी जाणार याचा? आता अमरावतीत पहिल्यांदाच आलेल्या गौतमीने राजकारणात कधी जाणार यावर भाष्य केलं आहे.

Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar : “जिवंतपणी मरण यातना…”, आरोग्यसेवेच्या विदारक स्थितीचा व्हिडीओ ट्विट करत वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल
SYMBIOSEXUAL
तुम्ही सुद्धा ‘Symbiosexual’ आहात का? ही नवीन लैंगिक ओळख नेमकी काय आहे? इंटरनेटवर याची इतकी चर्चा का?
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
shrikant shinde maharashtra assembly election 2024
Shrikant Shinde in Sangli: श्रीकांत शिंदेंकडून युतीच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा? खानापूरबाबत जाहीर कार्यक्रमात म्हणाले…
Hasan Mushrif on Sharad pawar
Hasan Mushrif on Sharad Pawar: “पवार साहेब तुमच्याशी वैर नाही, समरजित आता तुझी…”, हसन मुश्रीफांचे प्रत्युत्तर
Eknath Shinde First Reaction on Jaydeep Apte Arrest
Eknath Shinde : “जयदीप आपटेला अटक झाली आता कारवाई…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया
N. R. Narayana Murthy
N. R. Narayana Murthy : “माझ्यासारखं होऊ नको”, नारायण मूर्ती यांचा विद्यार्थ्याला सल्ला; म्हणाले, “माझ्यापेक्षा…”
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका

हे पण वाचा- ‘बिग बॉस मराठी’मध्ये जाणार का? गौतमी पाटीलने दोन शब्दात दिलं उत्तर, सूरज चव्हाणला शुभेच्छा देत म्हणाली…

गौतमी पाटील अमरावतीकरांबाबत काय म्हणाली?

“मी पश्चिम विदर्भात पहिल्यांदा आले आहे. अमरावतीत येण्याची पहिलीच वेळ आहे. सकाळपासून मी प्रेक्षकांचं प्रेम पाहते आहे. प्रेक्षकांना मी भेटले आहेत, प्रेक्षकांचं प्रेम पाहून मी भारावून गेले आहे. मला सकाळपासून भेटायला लोक येत आहेत. संतोष बद्रे यांनी मला अमरावतीत बोलावलं त्यांच्यामुळे मला अमरावतीकरांचं प्रेम पाहण्यास मिळतं आहे. मला बुधवारच्या कार्यक्रमातही छान वाटलं.” असं गौतमीने सांगितलं.

Dancer Gautami Patil
गौतमी पाटील आणि तिच्या कार्यक्रमाला होणारी गर्दी हा कायमच चर्चेचा विषय ठरतो. गौतमी पाटीलचा नाच पाहण्यासाठी लोक लांबून येऊन त्या ठिकाणी गर्दी करतात.

गौतमी पाटील राजकारणात जाणार का?

राजकारणाचा आणि माझा काही संबंध नाही. मी राजकारणात जाणार नाही. मी कलाकार आहे, मी माझी कला सादर करत असते. राजकारणाशी माझा काही काहीही संबंध नाही आज हे पुन्हा एकदा सांगते मी राजकारणात जाणार नाही. असं गौतमी पाटीलने ( Gautami Patil ) सांगितलं.

अमरावतीत येणाऱ्या विद्यार्थ्यांना गौतमीचा सल्ला काय?

बाहेरुन शिक्षणासाठी अमरावतीत येणाऱ्या मुलांना आणि मुलींना मी सांगेन की तुम्ही या ठिकाणी बिनधास्त राहा. अन्याय झाला तर बिनधास्त नडा, कुणाच्याही दबावाखाली राहू नका. तसंच स्वतःची काळजी घ्या असा सल्ला गौतमी पाटीलने ( Gautami Patil ) विद्यार्थ्यांना दिला आहे. एबीपी माझाशी तिने संवाद साधला. त्यावेळी तिने हे वक्तव्य केलं आहे.