निविदा मंजुरीच्या कारणावरून राडा

सांगली : निविदा मंजुरीच्या कारणावरून रात्री अध्यक्ष निवासात झालेल्या राडय़ानंतर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा गणपूर्तीअभावी मंगळवारी तहकूब करण्यात आली. निधीवाटपावरून धुमसत असलेला वाद हातघाईवर आल्याने रात्री अध्यक्ष निवासात शिवीगाळ, खुच्र्याची फेकाफेकीही झाली होती. परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप केल्यानंतर मंगळवारी सकाळी तक्रारीही मागे घेण्यात आल्या.  जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा आज बोलावण्यात आली होती. मात्र ही सभा ऑफलाइन घ्यावी असा सदस्यांचा आग्रह होता. मात्र करोना संसर्गाच्या धोक्यामुळे सभा ऑनलाइनच घ्यावी असे प्रशासकीय धोरण आहे. या सभेत पाच कोटी खर्चाची वॉटर एटीएम बसविण्याच्या कामाची निविदा मंजुरीचा विषय होता. याशिवाय स्वीय निधी वाटपात पदाधिकारी व सदस्य यांच्यामध्ये दुजाभाव होत असल्याचा आरोप काही सदस्यांचा होता.

Nagpur, Rain, Pm Narendra Modi,
नागपूर : मोदींच्या सभास्थळी पावसाचे पाणी, शिंदेंकडून मध्यरात्री पाहणी
percentage of voting in Mumbai,
मुंबई, ठाणे, नागपूर, पुणे शहरांतील मतदानाचा टक्का वाढणार कसा ? मतदारांचा निरुत्साह दूर करण्यावर निवडणूक आयोगाचा भर
Bhavana Gawali
यवतमाळ-वाशिममध्ये उत्कंठा शिगेला! महायुतीतर्फे भावना गवळी की संजय राठोड?
bharti kamdi marathi news, bharti kamdi palghar latest news in marathi
जिल्हा परिषद अध्यक्ष भूषविलेल्या भारती कामडी यांच्यापुढे आता लोकसभेचे आव्हान

या वादावर चर्चेसाठी अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचे पती नंदू कोरे, दीर राजू कोरे यांच्यासह तमणगोंडा रवि पाटील आदींसह प्रमोद शेंडगे, संभाजी कचरे, अरुण बालटे, सुनील पवार, सुनील पाटील आदी बसले होते. या वेळी चर्चेतून वाद वाढत गेल्याने शिवीगाळ करण्याबरोबरच मारहाण करण्यात आल्याची तक्रार अध्यक्षांचे पती नंदू कोरे यांनी केली होती. यावरून उभय बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारही विश्रामबाग पोलीस ठाण्यात रात्री उशिरा देण्यात आली. मात्र, आज सकाळी नेत्यांनी हस्तक्षेप करीत या तक्रारी मागे घेण्यास भाग पाडले. दरम्यान, या वादावादीनंतर मंगळवारी होणारी सर्वसाधारण सभा गाजण्याची चिन्हे असतानाच आज सदस्यच गैरहजर राहिल्याने गणपूर्तीअभावी सभा तहकूब करण्यात येत असल्याचे अध्यक्षा श्रीमती कोरे यांनी जाहीर केले. या वेळी उपाध्यक्ष शिवाजी डोंगरे, तमणगोंडा रवि पाटील, सरदार पाटील हे मोजकेच सदस्य उपस्थित होते.