तूर, हरभऱ्याचे दोन कोटी प्राप्त

शेतकऱ्यांना थकित पसे वाटप करण्यासाठी पणन महामंडळाकडून दोन कोटी रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली.

 शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या तूर आणि हरभऱ्याच्या पसे वाटपात दिरंगाई होत असल्याच्या विरोधात आमदार ओम राजेिनबाळकर मंगळवार, २४ जून रोजी जिल्हा पणन कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर संबंधित यंत्रणेस खडबडून जाग आली आहे. शेतकऱ्यांना थकित पसे वाटप करण्यासाठी पणन महामंडळाकडून दोन कोटी रुपये प्राप्त झाले असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यामध्ये पणन महामंडळाने २४ एप्रिल ते २४ मे या कालावधीत ११ हजार ३५९ क्विंटल तूर, चार हजार ३०० रुपयांप्रमाणे तर २१ हजार २७४ क्विंटल हरभरा ३१०० रुपयांप्रमाणे शेतकऱ्यांकडून खरेदी केला. हरभऱ्याची किंमत सहा कोटी ५९ लाख ४९ हजार ४०० रुपये होती. त्यापकी एक कोटी ९४ लाख ४९ हजार ४०० रुपये अदा करण्यात आले आहेत. तर खरेदी केलेल्या तुरीची किंमत चार कोटी ८८ लाख ४३ हजार ७०० रुपये होत असून, त्यापकी एक कोटी ९२ लाख ४३ हजार ७०० रुपयांचे वाटप करणे अद्याप बाकी आहे. हरभरा व तुरीच्या खरेदी मालाची एकूण किंमत ११ कोटी ४७ लाख ९३ हजार १०० रुपये होत असून, त्यापकी तीन कोटी ८६ लाख ९३ हजार १०० रुपये रक्कम अद्याप शेतकऱ्यांना वाटप करणे बाकी आहे.
खरेदी केलेल्या हरभरा व तुरीची रक्कम नऊ कोटी ८६ लाख ९३ हजार १०० रुपये शेतकऱ्यांना अदा करण्यात आले असून, उर्वरित तुरीचे दोन कोटी ९६ लाख व हरभऱ्याचे चार कोटी ६५ लाख रुपये वाटप करणे बाकी होते. आमदार राजेिनबाळकर यांनी या थकित रकमेसाठी २४ जून रोजी पणन महामंडळाच्या जिल्हा कार्यालयापुढे धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा गुरुवारी एका पत्राद्वारे संबंधितांना दिला होता. त्याची त्वरित दखल घेत पणन महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडून दोन कोटी रुपये झटपट प्राप्त झाले असून, त्याचे वाटप संबंधित शेतकऱ्यांना सुरू केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Get two crore rs toor harbhara

ताज्या बातम्या