"...म्हणून खडसे माझ्या आणि फडणवीसांच्या कानात काय म्हणाले ते सांगावं लागतं", गिरीश महाजनांचं वक्तव्य | Girish Mahajan comment on Eknath Khadse whispering in Devendra Fadnavis ears | Loksatta

“…म्हणून खडसे माझ्या आणि फडणवीसांच्या कानात काय म्हणाले ते सांगावं लागतं”, गिरीश महाजनांचं वक्तव्य

भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका केली.

“…म्हणून खडसे माझ्या आणि फडणवीसांच्या कानात काय म्हणाले ते सांगावं लागतं”, गिरीश महाजनांचं वक्तव्य
गिरीश महाजन, एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस

भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर सडकून टीका केली. “एकनाथ खडसे आमच्या कानात काय सांगतात ते लोकांपर्यंत न्यायची गरज नाही. मात्र, ते इतकं बोलत असल्याने सांगावं लागतं,” असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं. पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर ते सोमवारी (३ ऑक्टोबर) पहिल्यांदाच धुळे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. यावेळी शिरपूर येथे गिरीश महाजन आणि मंत्री विजयकुमार गावित यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

गिरीश महाजन म्हणाले, “एकनाथ खडसे माझ्या आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बोलत असल्याचे फोटो आणि व्हिडीओ उपलब्ध आहेत. ते आमच्याशी काय बोलत होते हे त्यांना विचारावं. भाषण दिल्यानंतर लगेच ते आमच्याजवळ येऊन अगदी खाली वाकून कानात सांगत होते. यावेळी बाजूचे लोकही ऐकत होते.”

“…म्हणून खडसे माझ्या आणि फडणवीसांच्या कानात काय म्हणाले ते सांगावं लागतं”

“मला त्याबद्दल खोटं बोलण्याची गरज नाही. ते इतकं बोलत आहेत म्हणून मला सांगावं लागत आहे. खरंतर माझी सांगण्याची इच्छा नव्हती. ते ज्या पद्धतीने टीका टिपण्णी करतात, बोलतात त्यामुळे आम्हालाही बोलावं लागतं. अन्यथा ते आमच्या कानात काय सांगतात ते लोकांपर्यंत न्यायची गरज नाही,” असं मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं.

“खडसेंनी मंत्रिपदासाठी वरिष्ठांकडे वशिला लावून ठेवावा”

मंत्रिमंडळानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल या एकनाथ खडसेंच्या दाव्यावर गिरीश महाजन म्हणाले, “एकनाथ खडसे यांना मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर शिंदे-फडणवीस सरकार कोसळेल असं वाटत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. त्यांनी मंत्रिपदासाठी वरिष्ठांकडे वशिला लावून ठेवावा. आम्हाला काहीही अडचण नाही.”

हेही वाचा : सीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

“एकनाथ खडसेंनी स्वप्न पाहणं बदं करावं”

“मला वाटतं आता एकनाथ खडसेंनी स्वप्न पाहणं बदं करावं. काय करणार, शेवटी त्यांना खूप अपेक्षा होत्या आणि त्यांचा अपेक्षा भंग झाला. त्यामुळेच ते अधूनमधून असं काही बोलत असतात,” असं म्हणत महाजनांनी खडसेंवर निशाणा साधला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
“नायजेरियातून मोदींनी आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला”; नाना पटोलेंचा अजब दावा

संबंधित बातम्या

“…तर राज्यपालांचा टकमक टोकावरून कडेलोट…”, उदयनराजे भोसलेंनी मांडली आक्रमक भूमिका; रायगडावरून भाजपावरही टीकास्र!
VIDEO: शिंदे गटाच्या आमदाराकडून शिवीगाळ, संजय राऊतांचं प्रत्युत्तर, म्हणाले, “तिथं ते शेपट्या घालत आहेत आणि…”
“शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे”, म्हणत रायगडावरून उदयनराजे भोसलेंची मोठी घोषणा; म्हणाले, “आझाद मैदानात…!”
‘…यामुळेच सातत्याने अशा घटना घडत आहेत’; वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपघातांवरून सचिन सावंतांची भाजपावर टीका
शिंदे- फडणवीस सरकारला मोठा धक्का, महाविकास आघाडी सरकारच्या विकासकामे रद्दच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती

व्हिडिओ

ताज्या बातम्या
तीन लग्नं, घटस्फोट अन्… वैवाहिक आयुष्यातील अपयशानंतर अशी झालेली शाहिदच्या आईची अवस्था
शिंदे- फडणवीस सरकारला मोठा धक्का, महाविकास आघाडी सरकारच्या विकासकामे रद्दच्या आदेशाला उच्च न्यायालयाची स्थगिती
IND vs BAN: न्यूझीलंडहून परतणारे टीम इंडियाचे खेळाडू खराब व्यवस्थेचे बळी; दीपक चहरने केली तक्रार, जाणून घ्या प्रकरण
‘…यामुळेच सातत्याने अशा घटना घडत आहेत’; वंदे भारत एक्स्प्रेसच्या अपघातांवरून सचिन सावंतांची भाजपावर टीका
‘खात्यात पैसे का नाहीत?‘ म्हणत बाईने घातला बॅंकेत राडा; दगडाने फोडल्या ATM च्या काचा अन्…