scorecardresearch

पालघर तालुक्यात प्रेम प्रकरणातून मुलीवर गोळीबार; मुलीसह प्रियकराचा मृत्यू

खैरेपाडा येथील एका उद्यानात बराच वेळ एकत्र राहिल्यानंतर या प्रेमी युगुलाने टीमा रुग्णालयाजवळ एकमेकांना आलिंगन देऊन फोटो काढले.

पालघर तालुक्यात प्रेम प्रकरणातून मुलीवर गोळीबार; मुलीसह प्रियकराचा मृत्यू
पालघर तालुक्यात प्रेम प्रकरणातून मुलीवर गोळीबार; मुलीसह प्रियकराचा मृत्यू

बोईसर : पालघर तालुक्यात बोईसर खैरापाडा येथील टीमा रुग्णालयाजवळ झालेल्या गोळीबार गोळीबारात एका 23 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला असून गोळीबारानंतर पळण्याच्या नादात अपघात होऊन तरुणाचा देखील मृत्यू झाला आहे. या तरुणाकडून गावठी कट्टा हस्तगत करण्यात आला आहे. मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव नेहा महतो असे आहे.

खैरेपाडा येथील एका उद्यानात बराच वेळ एकत्र राहिल्यानंतर या जुगल जोडीने टीमा रुग्णालयाजवळ एकमेकांना आलिंगन देऊन फोटो काढले. आज दुपारी 3.30 वाजता सुमारास बोईसर पोलीस स्टेशन हद्दीत टिमा शासकीय रुग्णालया समोर कृष्णा सत्यदेव यादव याने त्याची प्रेयसी नेहा दिनेश महतो हिच्यावर गावठी पिस्तूलामधून फायरिंग केली. सदर घटनेत मुलगी नेहा हिचा मृत्यू झाला आहे.घटनास्थळापासून सुमारे ५०० मीटर अंतरावर डी डेकॅार कंपनी समोर आरोपीने सीआयएसएफच्या वाहनाखाली उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला असून आरोपीस उपचाराकरिता रुग्णालयात दाखल केले असता आरोपीचा देखील मृत्यू झाला आहे. पिस्तूल हस्तगत करण्यात आलेले आहे.
पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केलेला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या