Devendra Fadnavis: लोकसभा निवडणूक निकाल लागून दोन महिने पूर्ण झाले आहेत. आता वेध लागले आहेत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे. महायुतीने विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी अमरावतीत जे भाषण केलं ते देखील याचीच प्रचिती देणारं होतं. महाराष्ट्रात आपल्याला नव्या दमाने मैदानात उतरण्याची गरज खऱ्या अर्थाने गरज आहे. आपण एकजुटीने मैदानात उतरलो तर महायुतीचा भगवा रोवण्यापासून आपल्याला कुणी रोखू शकणार नाही असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस? ( What Devendra Fadnavis Said? )

महाराष्ट्रात जी लोकसभा निवडणूक झाली, त्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांमध्ये काही प्रमाणात निराशा आली. कारण इतक्या कमी जागा येतील असं वाटलं नव्हतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा बनण्यासाठी कौल जनतेने दिला. त्याचवेळी महाराष्ट्रात आपण कमी पडलो याची खंतही आपल्याला आहे. महाराष्ट्रात पक्षात आपली लढाई तीन पक्षांशी नव्हती. चार पक्षांशी होती, चौथा पक्ष होता फेक नरेटिव्ह. असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

vasai bjp aggressive
कारवाई होत नसल्याने भाजप कार्यकर्ते हवालदिल; केंद्रात, राज्यात सत्ता, मात्र वसईत कुणी दाद देईना
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
aditya thackeray
Aditya Thackeray : “मुख्यमंत्री पदासाठी शरद पवारांच्या डोक्यात उद्धव ठाकरेंचा चेहरा नाही”, म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना आदित्य ठाकरेंचा टोला; म्हणाले…
jammu Kashmir polls
विश्लेषण: निष्ठावंतांची नाराजी भाजपला जम्मू व काश्मीरमध्ये भोवणार? नव्या चेहऱ्यांना संधी?
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
Rajendra Raut, Manoj Jarange,
सोलापूर : ओबीसीतून मराठा आरक्षणप्रश्नी पवार, ठाकरे, पटोलेंच्या सह्या आणा; राजेंद्र राऊत यांचे मनोज जरांगे यांना आव्हान
Congress National Spokesperson Supriya Srineet demanded that Eknath Shinde and Devendra Fadnavis resign
शिंदे-फडणवीस यांनी राजीनामा द्यावा; काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांची मागणी
Nashik, Badlapur incident, Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis, women empowerment campaign, Tapovan Maidan, opposition politicization,
करोना केंद्रांमधील अत्याचारावेळी गप्प का ? एकनाथ शिंदे यांच्याकडून उध्दव ठाकरे लक्ष्य

आपले विरोधक इतके निर्ल्लज आहेत की..

आपल्या विरोधकांचं धोरण म्हणजे रोज खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं. रोज खोटं बोललं की ते लोकांना खरं वाटू लागतं. इतके निर्लज्ज लोक आहेत की त्यांना खोटं बोलल्याशिवाय सकाळचा नाश्ताही घशाखाली उतरत नाही आणि रात्रीचं जेवणही. फेक नरेटिव्हला आपण परिणामकारक रित्या उत्तर देऊ शकलो नाही. त्याचा परिणाम असा झाला की काही मतं कमी झाली असं देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) म्हणाले.

Devendra Fadnavis
अमरावतीच्या भाषणात काय काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

मला तीन महिने द्या, सत्ता आपलीच

पुढचे तीन महिने तुम्ही मला द्या, मी राज्यात तुम्हाला तुमची सत्ता देतो. ज्या कार्यकर्त्यांना जिंकण्याची उर्मी आहे ते तुमच्यासारखे कार्यकर्ते बरोबर आहेत. आपण पुन्हा जर पूर्ण ताकदीने जर मैदानात उतरलो तर छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादने पुन्हा एकदा तुमच्या मनातलं सरकार आणून दाखवेन. असं आश्वासन देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी कार्यकर्त्यांना दिलं.

हे पण वाचा- Devendra Fadnavis : “उद्धव ठाकरेंना हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहिलं तेव्हा..”, देवेंद्र फडणवीस यांची बोचरी टीका

इतकी वर्षे शेतकऱ्यांची, गरीबांची आठवण विरोधकांना आली नाही का?

विरोधी पक्षातील लोक सत्तेत आले तर केवळ पैसा जमा करतात. मात्र, सत्ता गेली की यांना गरीब, शेतकरी, कष्टकरी आठवतो. तर माझा यांना सवाल आहे की, मागची ७० वर्ष तुम्ही राज्यात सत्ता उपभोगली. यावेळी तुम्हाला शेतकरी, कष्टकरी का आठवला नाही? तुम्हाला शेतमजूर, गरीब का आठवला नाही? तुम्हाला एससी, एसटी समाज का आठवले नाहीत? सत्तेवरून गेले की या सर्वांची आठवण होते आणि सत्तेवर हे लोक आले की तोंड मिटून ते गप्प बसतात. कारण सत्तेवर आले की तात्काळ स्वतःची घरभरणं, आपल्या तिजोऱ्या भरणं, वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे करत जनतेची लूट करणं, हेच यांना ठाऊक आहे. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच यांचे सूत्र आहे आणि हीच त्यांची मानसिकता असल्याची टीकाही देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांनी केलीय.