कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघाने (गोकुळ) दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्‍हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये शुक्रवारपासून (१ एप्रिल) दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी याबाबत बुधवारी (३० मार्च) माहिती दिली.

गोकुळ संघ साडेपाच लाख दूध उत्पादकांकडून सुमारे १३ लाख लिटर दररोज दूध खरेदी करते. त्यामुळे या नव्या दरवाढीच्या निर्णयानंतर शेतकऱ्यांना प्रतिदिन २६ लाख रुपये अधिक मिळणार आहेत. म्‍हैस दूध खरेदी दरामध्‍ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता खरेदी दर ४१.५० वरून ४३.५० रुपये इतका होणार आहे.

Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
chhagan bhujbal, armstrong company
भुजबळ यांच्या आर्मस्ट्राँग कंपनीला जिल्हा बँकेकडून २६ कोटींचा लाभ, थकीत कर्जफेडीसाठी ‘ओटीएस’ योजनेत सहभाग
Slum cleaning contract in court tender extended till April 3
झोपडपट्टी स्वच्छतेचे बहुचर्चित कंत्राट न्यायालयीन कचाट्यात, निविदेला ३ एप्रिलपर्यंत मुदतवाढ
Mumbai E auction shops
मुंबई : १७३ दुकानांचा ५ एप्रिल रोजी ई-लिलाव, नोंदणी, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

हेही वाचा : गोकुळ’चा एक दिवसात दूधविक्रीचा नवा उच्चांक

गाय दूध दरामध्‍ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता २७ वरून २९ रूपये इतकी वाढ करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. गोकुळ दूध संघाने गुडी पाडव्‍यापूर्वी दूध उत्‍पादकांसाठी दिलासा देणारी वाढ केली आहे. सुधारित दरपत्रक संघामार्फत प्राथमिक दूध संस्थाना पाठवण्यात येणार आहेत, असेही विश्वास पाटील यांनी सांगितले.