गोकुळ दुध संघ पुणे येथे गुंतवणूक कमी करत असताना तेथे दूध विक्री वाढत आहे. तर मुंबईमध्ये ३०० कोटी रुपयांची गुंतवणूक करून दूध विक्रीसाठी प्रयत्न सुरू असताना तेथे विक्रीत घट होत असल्याचे विपणन विभागाच्या अहवाल आधारे स्पष्ट झाले आहे. गोकुळच्या भवितव्याच्या दृष्टीने ही चिंतेची बाब आहे, असे मत गोकुळच्या संचालिका, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुडशिंगी येथील दोन दूध संघांचा पुरवठा गोकुळने बंद केला आहे. हा विषय मंगळवारी संचालक मंडळाच्या बैठकीत महाडिक यांनी उपस्थित केला असता व्यवस्थापनाने स्थानिक संचालकांनी शिफारस नसल्याने दूध संकलन थांबवले असल्याचे सांगितले. दूध स्वीकारण्याबाबत गोकुळ मधील पायंडा आणि कायदा याची गल्लत करू नये. हातकणंगले तालुक्यात मी संचालक असताना किती संस्थांची शिफारस माझ्याकडून घेतली गेली?  कागल तालुक्यामध्ये दोन संचालक असताना केवळ एकाच संचालकांची शिफारस का स्वीकारली जाते? ही दुटप्पी व मनमानी कामकाज पद्धत आहे. मुडशिंगी येथील महिला संघाचे दूध संकलन बंद केले असल्याने त्यांनी हे दुध अध्यक्ष विश्वास पाटील यांच्याकडे द्यावे का? अशी विचारणा त्यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gokuls decline in milk sales in mumbai is worrying shaumika mahadik abn
First published on: 25-01-2022 at 21:21 IST