वारकऱ्यांसाठी खूशखबर! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलबाबत घेतला मोठा निर्णय

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.

eknath shinde ashadhi wari
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे… (संग्रहीत फोटो)

जगद्गुरू संत तुकाराम महाराज आणि संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांनी पंढरपूरकडे प्रस्थान केलं आहे. राज्यभरातील हजारो वारकरी आषाढी वारीसाठी पंढरपुरकडे रवाना होत आहेत. आता ह्या वारकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्वीटर अकाउंटवरून त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं की, “कोकणातील गणेशोत्सवाप्रमाणे पंढरपूर येथे आषाढीच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोल माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला आहे. यासाठी वारकऱ्यांना वाहनांवर स्टिकर्स लावणे तसेच प्रादेशिक परिवहन अधिकारी आणि पोलिसांकडे नोंदणी करणे, याबाबत व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी मुख्य सचिवांना दिले आहेत.”

राज्यस्तरीय कोविड टास्क फोर्सचे काम नेहमीप्रमाणे सुरू राहावे – मुख्यमंत्री

कोविड काळात स्थापन करण्यात आलेल्या राज्यस्तरीय टास्क फोर्सचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरू ठेवावे आणि कोविड परिस्थितीत शासनाला योग्य त्या सूचना देण्यात खंड पडू देऊ नये, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहेत. आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांच्याशी चर्चा करून त्यांना यासंदर्भात सूचना दिल्या आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Good news for warkari chief minister eknath shinde took big decision toll free latest news rmm

Next Story
“पराभूत झाल्यानंतर घरी गेलो की बायको म्हणायची याला…”, शहाजीबापू पाटलांनी सांगितला ‘तो’ किस्सा!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी