“भोकं पडलेल्या फुग्याला राऊत एवढे का घाबरतात?”, गोपीचंद पडळकरांची टीका

कमरेचं सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहिण्याच्या विकृतीला बांध घाला, असंही पडळकर म्हणाले आहेत.

आपल्या हुजरेगिरीमुळे बावचळलेले खासदार संजय राऊत आता भोक पडलेल्या फुग्याला एवढे का घाबरतायेत? असं तर नाही की राणे साहेबांचा फुगा तुमच्याविषयीच्या गुपितांनी भरलेला आहे. तो फुटला तर तुमच्या तिन्ही धन्यांचा तुमच्यावरचा विश्वास उडून जाईल अशी टीका भारतीय जनता पक्षाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.

राणे साहेबांवरील सुडाची कारवाई म्हणजे कायद्याची कारवाई असे संबोधता, मग पोलिसांना त्यांच्या आई बहिणीवरून अत्यंत घाणरेड्या शब्दात शिव्या घालणाऱ्या वरूण देसाईला अटक का होत नाही? हेच का तुमचं महाराष्ट्र मॉडेल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.


ते पुढे म्हणाले, “ज्या बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसी विचारांचा विरोध केला आणि शरद पवारांचे नेहमी मार्मिक शब्दाने पितळ उघड पाडले पण तुम्ही आज त्यांचाच उधोउधो करणे म्हणजे बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा प्रकार नाही का? हिंदू समाजाला सडलेला म्हणणारा शर्जील उस्मान उजळ माथ्याने महाराष्ट्रात येऊन फिरतो आणि त्यावर कारवाई करण्याऐवजी सत्तेच्या लालसेपोटी तुमचे हात थरथर कापतात. मला बाळासाहेबांच्या सामनाचे दैनिक ‘बाबरनामा’त रूपांतर करणाऱ्याला हेच विचारायचे आहे की त्यावेळी यांची अस्मिता कुणाच्या पायापुढे लोटांगण घालते?”

संजय राऊत, कमरेचे सोडून डोक्याला बांधून अग्रलेख लिहीण्याची विकृतीला बांध घाला अन्यथा तुमच्या ‘हम करे सो’ या कायद्याच्या फुग्याला देशाच्या कानाकोपऱ्यातून भोकं पडतील असेही पडळकर म्हणाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gopichand padalkar criticize sanjay raut over samaana editorial vsk

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या