“वीस वर्षात राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करता आला नाही त्यांनी भाजपाची चिंता करू नये,” असा टोला भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना लगावला आहे. राज्यात २०२४ च्या निवडणुकीत पूर्ण बहुमताने सत्तेत येऊ, असा दावा करणाऱ्या भाजपाला महाविकास आघाडीचे निर्माते शरद पवार यांनी जशास तसे उत्तर देताना राज्यात भाजपाला पुन्हा सत्तेत येऊ देणार नाही, असे प्रतिआव्हान गुरुवारी दिले होते. पवार यांच्या निवासस्थानी गुरुवारी दोन बैठका झाल्या, त्यावेळी त्यांनी हा शब्द दिला. त्यावरुनच आता भाजापाचे नेते आणि महाराष्ट्र भाजपा आक्रमक झाल्याचं दिसत आहे.

विश्वासघात केला आणि सत्तेत आला…
“महाराष्ट्रात २०१४ ला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली १२२ आमदार या महाराष्ट्राने भाजपाच्या चिन्हावर निवडून दिले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपा, शिवसेना आणि मित्रपक्ष मिळून लोकांच्या समोर गेलो. फडणवीसांना पुन्हा महाराष्ट्रातील लोकांनी मुख्यमंत्रीपदावर बसवण्यासाठी भाजपाचे १०६ भाजपाचे आमदार आणि जवळपास ५५ शिवसेनेचे आमदार असे एकूण १६१ आमदार निवडून दिल्याचं आपण बघितलं. परत तुम्ही विश्वासघात केला. सत्तेमध्ये आलात. राज्यातील जनता आजही फडणवीस यांचं नेतृत्व मानते आणि भाजपासोबत आहे,” असं पडळकर म्हणाले आहेत.

supreme court rejected plea of dhangar community
धनगर आरक्षण याचिका फेटाळली; आदिवासींचा दर्जा देण्याच्या मागणीस न्यायालयाचा नकार
A proposal that Chhagan Bhujbal should contest elections from Nashik from BJP
‘कमळ’वर लढण्याचा भुजबळ यांना प्रस्ताव? ओबीसी मतपेढीसाठी भाजप पक्षश्रेष्ठींची खेळी
After the EPS-95 pensioners the Halba community also upset with BJP
इपीएस-९५ पेन्शनधारकानंतर ‘हलबा’ बांधवही सत्ताधाऱ्यांवर नाराज; म्हणाले, “भाजपला…”
BJP leaders in Gadchiroli
आयारामांची संख्या वाढल्याने भाजप नेते अस्वस्थ; भविष्यातील राजकारण धोक्यात…

पावसात भिजून सुद्धा…
पुढे बोलताना पडळकर यांनी थेट शरद पवारांवर टीका केलीय. “जनता भाजपासोबत असल्यामुळे तुम्ही किती जरी संघर्ष केला, आम्ही काहीतरी मोठे आहोत असं वातावरण तयार केलं तरी २०१९ ला साताऱ्यात पावसात भिजून सुद्धा तुम्हाला ५४ च्या वर जाता आलं नाही,” असा टोला पडळकरांनी लगावलाय.

…म्हणून वारंवार पवारांना सांगावं लागतंय
“त्यांची (राष्ट्रवादीची) ५४ ची संख्या कायम ठेवण्यासाठी त्यांना वारंवार त्यांच्याच आमदारांना विश्वास द्यावा लागतोय. तुम्ही घाबरु नका, काळजी करु नका असं सांगावं लागतंय. पण तुमच्या हातातच काही नाही. कारण त्यांना त्यांची ५४ ची संख्या कमी होऊ नये याची काळजी असल्याने वारंवार सांगावं लागतंय की भाजपाला मी येऊ देणार नाही,” असं पडळकर म्हणालेत.

पाच राज्यांमधील निवडणुकांचा संदर्भही दिला
पाच राज्यांपैकी चार राज्यांमध्ये झालेल्या भाजपाच्या विजयाचा दाखलाही पडळकरांनी दिलाय. “तुम्ही सगळ्यांना पाहिलं की पाच राज्यांमध्ये निवडणुका झाल्या. हे सगळे येऊन सारखं सांगत होते की आता उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडमध्ये सत्ता येणार नाही. वारंवार हे सांगण्यात आलं. पण तिथल्या लोकांनी नरेंद्र मोदींच्या विकासाच्या अजेंडा आहे, सर्वसामान्यांना केंद्रस्थानी मानून केलेलं काम आहे ते लोकांना आवडलं. राष्ट्रीयत्वाच्या बाबतीत जी भूमिका केंद्र सरकार निभावतंय. या देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा कोणतंही केंद्र सरकार इतक्या राष्ट्रीयत्वासाठी काम करत असल्याने लोकांनी भाजपाला निवडलं. चार राज्यात परत सत्ता दिली,” असं पडळकर यांनी म्हटलंय.

भाजपाच नंबर एकचा पक्ष राहणार
“फडणवीसांनी नागपूरमध्ये जी भूमिका मांडली ती योग्यच आहे. त्यानुसारच नगरपंचायत निवडणुका झाल्या त्यात भाजपा एक नंबर आहे. सत्तेत नसताना भाजपा एक नंबरला राहतोय पक्ष. ज्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका येतील त्या तसेच २०२४ ला विधानसभेची निवडणूक येईल त्यातही भाजपा एक नंबरला असेल,” असा विश्वास पडळकरांनी व्यक्त केलाय.

आमचा आमच्या नेतृत्वावर विश्वास
“आमचे १०६ असून ते रोज सांगायचे आता १०-१५ आमदार फुटणार आहेत. मात्र तसं काहीही झालं नाही कारण आमच्या सगळ्या लोकप्रितिनिधींचा नेतृत्वावर विश्वास आहे,” असा टोलाही पडळकरांनी लागवलाय.

काय अडचण आहे तुम्हाला मुख्यमंत्री बसवायला…
“भाजपाची काळजी करायचं कारण राष्ट्रवादीला नाही. त्याचे आमदार कसे शाबूत राहतील, त्यामध्ये काही गळती होऊ नये याची काळजी त्यांनी घ्यावी,” असं पडळकर म्हणालेत. तसेच पुढे बोलताना, ” तुमचा पक्ष स्थापन झाल्यापासून तुमचा मुख्यमंत्री का बसवता आला नाही. काय अडचण आहे तुम्हाला. तुम्ही जर सगळ्या देशाचं नेतृत्व करायची भूमिका घेताय. देशातील, राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताय, तुमचं मत व्यक्त करतायत. मग महाराष्ट्रात तुम्हाला तुमचा, राष्ट्रवादीचा नेता मुख्यमंत्री म्हणून का बसवता आला नाही याचं उत्तर तुम्ही राज्यातल्या लोकांना द्या,” असंही पडळकर म्हणाले आहेत.

आम्ही विरोधात असलो तरी…
“भाजपाची चिंता करु नका. आम्ही सक्षम आहोत. आम्ही लोकांसाठी काम करतोय. आम्हाला लोकांनी सत्तेत येण्याचा कौल दिलेला असताना. सत्तेत येण्याचं जनमत दिलेलं असताना सुद्धा आमच्या पक्षाला तुम्ही विश्वासघाताने विरोधात बसवलंय. आम्ही विरोधात बसलो तरी या महाराष्ट्रातील सर्व लोकांची भूमिका विरोधक म्हणून ठामपणे खालच्या सभागृहामध्ये आणि वरच्या सभागृहामध्ये मांडतोय. आणि सरकारला त्या विषयावर निर्णय घेण्यास भाग पाडतोय,” असं पडळकरांनी स्पष्ट केलंय.