“…तेव्हा हाताला लकवा मारतो काय?”; पडळकरांनी संजय राऊतांवर साधला निशाणा

“तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरून उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नसेल”

Gopichand Padalkar criticizes Sanjay Raut
उस्मानाबादमधील घटनेचा संदर्भ देत केली टीका

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाजपाचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निशाणा साधला आहे. आज सामनामधील अग्रलेखामधून भाजपावर केलेल्या टिकेच्या पार्श्वभूमीवर पडळकर यांनी राऊत यांच्यासहीत शिवसेनेवर काही दिवसांपूर्वी उस्मानाबादमध्ये झालेल्या हिंसेच्या पार्श्वभूमीवर टीका केलीय. “जनाब संजय राऊत महाराष्ट्रात औरंगाजेबाची स्तुती करणारी पोस्ट लिहली जाते व त्यावरून उस्मानाबादेत दंगे होतात पण तुमचा महाराष्ट्रातील कमकुवतपणा व लाचारी लपविण्यासीठी तुम्ही भाजपाला हिंदुत्व शिकवणारे मोठे मोठे लेख लिहता,” असा टोला पडळकर यांनी लगावला आहे.

तसेच पडळकर यांनी इतर विषयांवर लिहिताना तुमच्या हाताला लकवा मारतो का?, असा प्रश्न राऊत यांना विचारलाय. “जनाब राऊत तुम्हाला कदाचित काकांच्या मांडीवरून उस्मानाबादमध्ये झालेला भगव्याचा अपमान व औरंगजेबाच्या अवलादींचा तांडव दिसत नसेल. ऐन हिंदू सणाच्या दिवशी महाराष्ट्राची व हिंदुत्वाची शान असलेला भगवा ध्वज लावण्यावरून उस्मानाबादमध्ये पोलीसांवर दगडफेक होते त्यावेळेसे ऐरवी उस्मानाबादला धाराशिव करू म्हणणाऱ्यांच्या हाताला काय लकवा मारतो काय?”, अशी टीका पडळकर यांनी केलीय.

“तुमच्या आघाडी सरकारमधील मंत्री स्वांतत्र्यवीर सावरकरांवर उलट सुलट लिहतात. त्यावेळेस सत्ता टिकविण्यासाठी तुमच्या वाघाचा ससा होतो का?,” असा प्रश्न पडळकरांनी विचारलाय. “तुमच्या औरंगाबादमध्ये गरोदर महिलांवर अत्याचार होतो तरी त्यावर आपल्याला एक ओळ खरडावी वाटत नाही. औरंगाबादला संभाजी नगर करू म्हणाऱ्यांना आता निजामशाहीचीच पालखी वाहण्यातच जास्त आनंद मिळतोय. असंच दिसतंय,” असंही पडळकर म्हणाले आहेत.

हिंदुत्ववाद या मुद्द्यावरुन राज्यामध्ये भाजपा आणि शिवसेनेमध्ये टीका करण्याची स्पर्धा सुरु असतानाच आज शिवसेनेने याच मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील भाजपा नेत्यांना सुनावलं आहे. काश्मीरातील हिंदूंच्या किंकाळ्यांनी ज्यांचे मन द्रवत नाही त्यांनी महाराष्ट्रावर प्रवचने झोडू नयेत असा टोला शिवसेनेने लगावला आहे. तसेच काश्मीरातील व बांगलादेशातील होरपळणाऱ्या हिंदूंचे रक्षण करणे हे मोदी सरकारचेच कर्तव्य आहे, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. यावेळी शिवसेनेनं हिंदूच्या संरक्षणासाठी सीमेवर धडकणाऱ्या शत्रूला चोख उत्तर दिलं पाहिजे असं काश्मीर आणि बांगलादेशचं उदाहरण देत म्हटलं आहे. तसेच लाल किल्ल्यावर फडकणारा तिरंगा सुरक्षित आहे काय?, असा प्रश्नही शिवसेनेनं उपस्थित केलाय.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Gopichand padalkar slams sanjay raut over hindutva article scsg

ताज्या बातम्या