एकच मिशन जुनी पेन्शन, पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, आमदार, खासदार तुपाशी कर्मचारी उपाशी, राजस्थान छत्तीसगड हिमाचल प्रदेश देऊ शकते जुनी  पेन्शन तर महाराष्ट्र शासन का नाही या घोषणाचे फलक घेऊन तासगाव शहरातील पंचायत समिती येथून शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांच्यावतीने शनिवारी मूक मोर्चा काढण्यात आला.

हेही वाचा >>> महाबळेश्वर कासवंड वनक्षेत्रात रानगव्याचा मृत्यू

Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
onine
नाशिकमध्ये पर्यायी कांदा बाजार सुरू; तरीही शेतकऱ्यांची लूट ?
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी

जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे. आज या मागणीसाठी शहरातून मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी तासगाव पंचायत  समिती समोर झालेल्या सभेत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. या मुकमोर्चामध्ये  तासगाव  तालुका सर्व संवर्गातील समन्वय समिती, महसूल विभागाचे कर्मचारी, आरोग्य विभागचे कर्मचारी, पंचायत समितीचे सर्व विभागातील अधिकारी, कर्मचारी, प्राथमिक, शिक्षक, माध्यमिक शिक्षक मोठ्या उपस्थित होते. यावेळी कक्ष अधिकारी, लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना, लेखा कर्मचारी संघटना, परिचर संघटना, विविध शिक्षक संघटना व नेते यांच्यासह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते.